बनावट कुरिअरचा सापळा! एक ओटीपी आणि बँक खातं रिकामं- सावधान राहा


बनावट कुरिअरचा सापळा ओळखा – तुमची सावधगिरीच तुमचं संरक्षण

ऑर्डर नाही, तरी पार्सल आलं? सावधान – फसवणुकीचा नवा प्रकार

ओटीपी म्हणजे तुमचं तिजोरीचं लॉक – कोणालाही देऊ नका चावी
पालघर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.26 ऑक्टोबर 2025 : सायबर गुन्हेगार आता नवे नवे प्रयोग करत आहेत. ताज्या प्रकारात ते बनावट कुरिअर डिलिव्हरी बॉय बनून लोकांची फसवणूक करत आहेत.तुमच्या नावावर पार्सल आलंय,कॅश ऑन डिलिव्हरी आहे,असं सांगून ते घरपोच पोहोचतात. आश्चर्य म्हणजे लोकांनी ती ऑर्डर केलीलीही नसते.

ग्राहक पार्सल नाकारतो तर फसवणूक करणारा डिलिव्हरी बॉय पार्सल रद्द करण्यासाठी ओटीपी आवश्यक आहे असं सांगतो.ग्राहकांनी तो ओटीपी दिला की, काही सेकंदांत बँक खातं रिकामं होतं.
सायबर पोलीस स्टेशन,पालघर यांनी नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन केलं आहे – ऑर्डर न केलेले पार्सल स्वीकारू नका.कोणत्याही परिस्थितीत ओटीपी, बँक किंवा वैयक्तिक माहिती शेअर करू नका.
शंका आल्यास त्वरित सायबर हेल्पलाईन 1930 वर संपर्क करा.
पालघर पोलिसांचे आवाहन:
तुमची जागरूकता म्हणजे तुमचं सायबर कवच.





