महा ई-सेवा केंद्रांच्या माध्यमातून डिजिटल महाराष्ट्र च्या दिशेने पाऊल


पंढरपूर पंचायत समितीत आमदार अभिजीत पाटील यांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय बैठक

डिजिटल पंढरपूरकडे वाटचाल – शासनसेवा एका क्लिकवर

आमदार अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा केंद्रांचा सक्षमीकरण संकल्प
ऑनलाईन सेवांमुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि मेहनत वाचणार

पंढरपूर, दि. 26 ऑक्टोबर 2025 : पंढरपूर पंचायत समितीच्या सभागृहात महा ई-सेवा केंद्र आणि आपले सरकार सेवा केंद्र यांच्या तालुकास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत आमदार अभिजीत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ, वेगवान आणि पारदर्शकपणे उपलब्ध करून देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

बैठकीत तहसीलदार सचिन लंगोटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, सेवा केंद्र संचालक आणि स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते.
ऑनलाईन सेवांना नवा वेग – नागरिकां पर्यंत शासन थेट पोहोचविण्याचा प्रयत्न
बैठकीत आपले सरकार सेवा केंद्र आणि महा ई-सेवा केंद्र यांच्या माध्यमातून नागरिकांना आवश्यक सरकारी सेवा डिजिटल पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी नवीन उपक्रम आणि तांत्रिक सुलभतेबाबत चर्चा झाली.
आमदार अभिजीत पाटील यांनी नागरिकांना ऑनलाईन सेवांचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन केले. त्यांनी म्हटले,डिजिटल महाराष्ट्र घडविण्यात प्रत्येक सेवा केंद्राची महत्त्वाची भूमिका आहे. ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत शासनाच्या सेवा एका क्लिकवर पोहोचल्या पाहिजेत.
तहसीलदार सचिन लंगोटे यांचा भर – सेवांच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक

तहसीलदार सचिन लंगोटे यांनी केंद्र संचालकांना नागरिकाभिमुख दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन करताना सांगितले की,प्रत्येक अर्ज, प्रमाणपत्र, किंवा सेवा — वेळेवर आणि प्रामाणिकपणे पुरविणे हेच खरी डिजिटल प्रगती आहे.
बैठकीतील प्रमुख मुद्दे:
ऑनलाईन शासकीय सेवांचा प्रसार व अंमलबजावणी
ग्रामीण भागात डिजिटल साक्षरतेचा विस्तार
ई-सेवा केंद्रांच्या कामकाजात पारदर्शकता
नागरिकांचे समाधान आणि सुलभ प्रशासन




