राजभवनात भव्य प्राकृतिक कृषी संमेलन — डॉ.नीलम गोऱ्हेंकडून राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना दिवाळी शुभेच्छा

राजभवनात भव्य प्राकृतिक कृषी संमेलन — डॉ.नीलम गोऱ्हेंकडून राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना दिवाळी शुभेच्छा

राज्यपाल आचार्य देवव्रत व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला

राजभवनात हरित संकल्प – डॉ. नीलम गोऱ्हेंकडून राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना दिवाळी शुभेच्छा

मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज, दि.२४ ऑक्टोबर २०२५ : राजभवनातील दरबार हॉलमध्ये आज ‘प्राकृतिक कृषी संमेलन २०२५’ हा राज्यस्तरीय भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात राज्यपाल आचार्य देवव्रत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष उपस्थितीत महाराष्ट्रातील शाश्वत शेती आणि नैसर्गिक शेती पद्धतींवर चर्चा झाली.

याप्रसंगी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. त्यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दोन्ही मान्यवरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा व भेटवस्तू प्रदान केल्या.

डॉ. गोऱ्हेंकडून अभिनंदन आणि शुभेच्छा

डॉ.नीलम गोऱ्हे यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बारबाडोस येथे झालेल्या ६८ व्या राष्ट्रकुल संसदीय संघटना (CPA) परिषदेत यशस्वी सहभागाबद्दल अभिनंदन व्यक्त केले. तसेच, राज्यातील शेतकरी सशक्त करण्यासाठी नैसर्गिक कृषीच्या संकल्पनेला अधिक बळ देण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

राज्यपालांचा संदेश — प्राकृतिक शेती म्हणजे पर्यावरणपूरक समृद्ध भारताचा पाया

राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी या संमेलनातून नागरिकांना रासायनिकमुक्त शेती आणि आरोग्यदायी आहार यांचे महत्त्व पटवून दिले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडून नैसर्गिक कृषी प्रकल्पांना भरीव पाठबळ देण्याचा संकल्पही मांडला.

Leave a Reply

Back To Top