एमआयटी कन्यांचा जिल्ह्यात विजयाचा डंका


बॅडमिंटन कोर्टावर एमआयटी मुलींची दमदार कामगिरी — विभागीय पातळीवरही सज्ज

एमआयटी ज्युनिअर कॉलेजचा डंका — जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत चमकदार विजय

सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज – क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि सोलापूर जिल्हा क्रीडा विभाग यांच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन येथे नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत वाखरी ता.पंढरपूर येथील एमआयटी विश्वशांती गुरुकुल ज्युनिअर कॉलेजच्या मुलींनी जिल्हा विजेतेपद पटकावत सर्वांचे लक्ष वेधले.
१९ वर्षांखालील गटातील या मुलींच्या संघात अनुष्का चाकूर,संजना बाड,श्रद्धा महाडिक,आर्या कुलकर्णी आणि ज्ञानेश्वरी फावडे या खेळाडूंचा समावेश होता. या सर्वांची अहिल्यानगर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असून त्या सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

त्याचबरोबर मुलांच्या संघानेही उत्कृष्ट प्रदर्शन करत तृतीय क्रमांक मिळवला. पारस शेठ, पार्श्व देशमाने, कृष्णा जाधव, अथर्व चव्हाण आणि वेदांत सोनटक्के या खेळाडूंचा या संघात समावेश होता.त्यापैकी पारस शेठची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
क्रीडा अधिकारी दत्तात्रय वरकड आणि पंच हर्षद शेख यांच्या उपस्थितीत या स्पर्धा पार पडल्या.संस्थेच्या मुख्याध्यापिका शिबानी बॅनर्जी व प्राचार्य डॉ.स्वप्नील शेठ यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन करत पुढील पातळीवरील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
एमआयटीज्युनिअरकॉलेज,बॅडमिंटनस्पर्धा, सोलापूरक्रीडा,महिलाशक्ती,trending, ज्ञानप्रवाहन्यूज,MIT,mitsports,Trend,



