वय फक्त आकडा ठरला, म्हसवडचे माजी नगराध्यक्ष नितिन दोशी धावले प्रेरणेच्या मार्गावर

६६ व्या वर्षी तरुणांना टक्कर,नितिन दोशींची जोशात एकता दौड

वय फक्त आकडा ठरला, म्हसवडचे माजी नगराध्यक्ष धावले प्रेरणेच्या मार्गावर

वयाला हरवणारी एकता दौड,६६ व्या वर्षी २ कि.मी.धावत तरुणांना दिला प्रेरणेचा धडा

म्हसवड/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३१ ऑक्टोबर २०२५ – भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेल जयंतीनिमित्त सातारा जिल्हा पोलीस दलाच्यावतीने म्हसवड पोलीस स्टेशनतर्फे एकता दौड हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.

आज सकाळी ६:३० वाजता म्हसवड बसस्थानक ते मायणी चौक या मार्गावर आयोजित या दौडीत अनेक नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. मात्र या उपक्रमात सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते म्हसवड नगरीचे माजी नगराध्यक्ष नितिन दोशी यांनी.

वयाच्या ६६ व्या वर्षी माजी नगराध्यक्ष नितिन दोशी यांनी तब्बल २ कि.मी. अंतर पूर्ण करत तरुणाईला लाजवेल अशी ऊर्जा दाखवली.त्यांच्या या जोशपूर्ण सहभागामुळे उपस्थितांनी उत्स्फूर्त टाळ्यांच्या गजरात त्यांचा गौरव केला.

समाजात एकतेचा संदेश देतानाच वय म्हणजे फक्त आकडा, जोश आणि जिद्द असेल तर काहीही शक्य आहे हे माजी नगराध्यक्ष नितिन दोशी यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले.

Leave a Reply

Back To Top