हाताच्या चिन्हासाठी घराघरात प्रचार – सोलापूर युवक काँग्रेस पदाधिकारी तेलंगणात मैदानात

तेलंगणा पोटनिवडणूक- तेलंगणात काँग्रेस उमेदवार नवीन यादव यांच्या प्रचारात सोलापूरच्या युवक काँग्रेसचा उत्साही सहभाग

जुबली हिल्स पोटनिवडणुकीत सोलापूरचा आवाज – सुनील सारंगी व कुणाल गायकवाड प्रचाराच्या अग्रभागी

हाताच्या चिन्हासाठी घराघरात प्रचार – सोलापूरचे युवक काँग्रेस पदाधिकारी तेलंगणात मैदानात

हैदराबाद/ज्ञानप्रवाह न्यूज– तेलंगणा राज्यातील जुबली हिल्स विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार नवीन यादव यांच्या विजयासाठी खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर युवक काँग्रेसचे सोशल मीडिया प्रमुख सुनिल सारंगी आणि काँग्रेसचे पदाधिकारी कुणाल गायकवाड यांनी सक्रिय सहभाग घेतला.त्यांनी स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांसह घर ते घर जाऊन मतदारांशी संवाद साधत नवीन यादव यांच्या समर्थनार्थ प्रचार केला.

प्रचारादरम्यान नागरिकांना हाताच्या चिन्हासमोरील बटण दाबून नवीन यादव यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. स्थानिक नागरिकांनीही काँग्रेस उमेदवाराविषयी उत्साह दाखवित युवक,तळागाळातील आणि जनतेचा आवाज असलेले नेते म्हणून नवीन यादव यांना आम्ही पाठिंबा देणारच, असे मत व्यक्त केले.

जुबली हिल्स मतदारसंघात काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता नवीन यादव यांच्या विजयाचा झेंडा फडकणार असा विश्वास स्थानिक काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला आहे.

या प्रचार मोहिमेत मिरयालगड्डा आमदार लक्ष्मण रेड्डी, तेलंगणा माजी प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष शिवसेना रेड्डी,नवीन यादव यांचे बंधू वेंकट यादव, तसेच स्थानिक युवा नेते साई तोडेटी आणि रमेश कोंडापल्ली उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top