डॉक्टर आत्महत्येचा तपास महिला IPS अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील SIT कडून होणार – खासदार प्रणिती शिंदेंच्या मागणीची दखल

खासदार प्रणिती शिंदे यांच्या मागणीची दखल

फलटण डॉक्टर आत्महत्येचा तपास महिला IPS अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील SIT कडून होणार

सातारा/बीड/ज्ञानप्रवाह न्यूज- फलटण येथील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात अखेर खासदार प्रणिती शिंदे यांच्या ठाम मागणीची राज्य सरकारने दखल घेतली आहे.या प्रकरणाचा तपास आता IPS महिला अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक ( SIT ) करणार असल्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

डॉ.संपदा मुंडे या उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे कार्यरत होत्या.काही दिवसांपूर्वी त्यांनी आत्महत्या केली असून त्यांच्या सुसाईड नोटमध्ये वरिष्ठांकडून व राजकीय नेत्याकडून होत असलेल्या मानसिक छळाचा उल्लेख केला होता. या घटनेनंतर राज्यभरात संताप व्यक्त होत होता.

या पार्श्वभूमीवर सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी बीड येथे डॉ.संपदा मुंडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करून सविस्तर चर्चा केली. त्यांनी कुटुंबियांना दिलासा देत सांगितले की,या प्रकरणी न्याय मिळाल्या शिवाय आपण शांत बसणार नाही. स्वतंत्र आणि निष्पक्ष तपास व्हावा, म्हणून S.I.T. चौकशीची मागणी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे केली आहे.

या ठाम मागणीनंतर राज्य सरकारने तत्काळ निर्णय घेत, महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र S.I.T. गठीत करण्याचे निर्देश दिले. ही समिती प्रकरणाचा सर्वांगीण तपास करून अहवाल सादर करणार आहे.

खासदार प्रणिती शिंदे यांनी या प्रकरणी सरकारकडून जलद, निष्पक्ष तपासाची मागणी केली असून, दोषींवर कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Back To Top