कार्तिकी वारीत वारकऱ्यांची तहान भागवत आहेत स्वेरीचे विद्यार्थी


स्वेरीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा उपक्रम

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – कार्तिकी वारीच्या निमित्ताने दर्शन रांगेत तासन तास उभ्या असलेल्या वारकऱ्यांची तहान स्वेरीचे विद्यार्थी शुद्ध पाणी देवून भागवीत आहेत. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऑटोनॉमस चे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार यांच्या सहकार्याने व उपप्राचार्या डॉ.मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली इंजिनिअरिंगचे विद्यार्थी, विभागप्रमुख आणि प्राध्यापक वर्ग हे पाणी वाटप करत आहेत.
स्वेरीचे सचिव डॉ.सुरज रोंगे यांच्या हस्ते रिद्धी सिद्धी मंदिराजवळ पाणी वाटपाच्या या उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले. या पाणी वाटपाच्या उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी तसेच संस्थेतील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी पाणी वाटप करत आहेत.

स्वेरीचे विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.महेश मठपती,स्वेरीच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.अमोल चौंडे,प्रा.महुवा बिस्वास यांच्या सह सहकारी, प्राध्यापक व विद्यार्थी या उपक्रमासाठी विशेष कष्ट घेत आहेत. परंपरेप्रमाणे दर्शन रांगेतील वारकऱ्यांना आर.ओ.फिल्टर्ड पिण्याचे पाणी वाटप कार्य नवमी शुक्रवार ३१ ऑक्टोबर पासून सुरु झाले. वारकऱ्यांच्या उपस्थितीत रिद्धी सिद्धी गणपती मंदिरालगत असणाऱ्या पत्राशेड मधील दर्शन मंडप रांगेतील वारकऱ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी देण्याच्या कार्याला आज दशमीच्या दिवशी अधिक गती आली आहे. सकाळी ८.०० ते सायंकाळी ८.०० या वेळेत गोपाळपूर, रिध्दी-सिध्दी मंदिर व दर्शन बारी,पत्रा शेड या ठिकाणी प्राध्यापक व विद्यार्थी वारकऱ्यांना उत्साहाने आर.ओ.फिल्टर्ड पाण्याचे वाटप करत आहेत.नवमी, दशमी व एकादशी या तीनही दिवशी विद्यार्थी ग्लास, वॉटर जग आणि वॉटर टॅंकद्वारे पाणी वारकऱ्यांपर्यंत पोहचवून वारकऱ्यांची तहान भागवणार आहेत.या कार्यात प्राध्यापक वर्ग व राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी वारकऱ्यांना पाणी वाटपाचे कार्य मनोभावे करत आहेत.
स्वेरी,स्वेरी इंजिनिरींग कॉलेज,डॉ बीपी रोंगे,



