माजी पंतप्रधान इंदिरा गांधी जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

इंदिरा गांधी जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मतेची शपथ

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

धुळे,दि.19 नोव्हेंबर 2025/ जिमाका वृत्तसेवा : देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन आणि राष्ट्रीय एकात्मता दिनाचा कार्यक्रम आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात उत्साहात संपन्न झाला.

उपजिल्हाधिकारी संजय बागडे यांच्या हस्ते इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देत देशाच्या ऐक्य, बंधुता आणि सामूहिक विकासासाठी कार्यरत राहण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमास सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी अर्चना भगत,नायब तहसिलदार मायानंद भामरे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त आयोजित हा कार्यक्रम देशाच्या एकोपा आणि अखंडतेचा संदेश दृढ करणारा ठरला.

Leave a Reply

Back To Top