एअरलेस टायर : पंक्चरमुक्त नवे तंत्रज्ञान; ट्यूबलेसपेक्षा दुप्पट आयुष्य ?

एअरलेस टायर : पंक्चरमुक्त नवे तंत्रज्ञान; ट्यूबलेसपेक्षा दुप्पट आयुष्य ?

वाहन उद्योगात क्रांती,हवा नसणारे एअरलेस टायर ठरणार भविष्यातील नवे मानक

काही वर्षांपूर्वीपर्यंत आपल्या वाहनांमध्ये ट्यूब असलेले टायरच वापरले जात. त्यानंतर ट्यूबलेस टायर सर्वत्र लोकप्रिय झाले. आता नव्या तंत्रज्ञानामुळे वाहन उद्योगात आणखी एक मोठा बदल घडत आहे तो म्हणजे एअरलेस टायरचा.या टायरमध्ये हवा भरावी लागत नाही आणि पंक्चर होण्याचा त्रासही नसतो. त्यामुळे भविष्यात वाहन क्षेत्रातील ही मोठी क्रांती ठरणार आहे.

एअरलेस टायर म्हणजे काय ?

एअरलेस टायर म्हणजे असे टायर ज्यामध्ये हवा अजिबात भरली जात नाही. रबरचे विशेष स्पोक्स आणि मजबूत बेल्ट यांच्या साहाय्याने त्याची अंतर्गत रचना तयार केली जाते, ज्यामुळे हवा नसतानाही टायर आपला आकार आणि मजबुती टिकवून ठेवतो. हे टायर बाहेरूनही फ्यूचरिस्टिक व आकर्षक दिसतात.या टायरची सर्वात मोठी खासियत म्हणजे पंक्चर होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कील, काच किंवा कोणतीही नुकीली वस्तू यांचा या टायरवर परिणाम होत नाही. त्यामुळे यांची देखभाल कमी लागते त्यामुळे ना वारंवार हवा तपासण्याची गरज, ना पंक्चर दुरुस्तीचा त्रास.

एअरलेस टायरची लाइफ किती ?

एअरलेस टायरचे आयुष्य सामान्य ट्यूबलेस टायरपेक्षा जास्त मानले जाते. हवेशी संबंधित समस्या किंवा पंक्चर नसल्याने हे टायर अधिक टिकाऊ ठरतात. मजबूत रबर व सिंथेटिक फायबरच्या साहाय्याने तयार झालेल्या या टायरचे आयुष्य साधारण ८०,००० ते १,००,००० किलोमीटर इतके असू शकते.याउलट सामान्य ट्यूबलेस टायरचे आयुष्य सरासरी ५०,००० ते ७०,००० किलोमीटर असते.तथापि हे आयुष्य रस्त्यांची अवस्था, वाहनाचा वापर आणि ड्रायव्हिंग पध्दती वरही अवलंबून असते.

ट्यूबलेस टायरपेक्षा एअरलेस टायर किती चांगले ?

ट्यूबलेस टायरमध्ये हवा भरल्यानंतर ते रिमशी एअरटाइट सील बनवतात. पंक्चर झाले तरी हवा हळूहळू बाहेर पडते, त्यामुळे वाहन नियंत्रणात राहते. म्हणूनच आज जवळपास सर्वच नवीन गाड्यांमध्ये ट्यूबलेस टायर दिले जातात.
मात्र एअरलेस टायर या पातळीपेक्षाही एक पाऊल पुढे गेले आहेत. कारण—

  • त्यामध्ये हवा नसते, त्यामुळे ब्लोआउट किंवा पंक्चरचा धोका शून्य
  • जास्त टिकाऊ आणि मजबूत
  • कमी देखभाल
  • पर्यावरणासाठी तुलनेने अधिक अनुकूल
    या फायद्यांमुळे एअरलेस टायर भविष्यात वाहन उद्योगातील सर्वात मोठा बदल ठरू शकतो.

Leave a Reply

Back To Top