मोबाईल हाताळताना काळजी घ्या-ॲड. भंडारींची नागरिकांना डिजिटल चेतावणी


फसव्या लिंकपासून सावध सायबर जगाचे सत्य उलगडले,धुळ्यात ॲड.चैतन्य भंडारी यांचे प्रभावी सायबर जागरूकता सत्र

आयुर्वेदिक क्लिनिकमध्ये नागरिकांना दिले डिजिटल सुरक्षेचे धडे

धुळे /ज्ञानप्रवाह न्यूज :-धुळे शहरातील डॉ. प्रवीण जोशी यांच्या आयुर्वेदिक क्लिनिक मध्ये नुकतेच सायबर गुन्हेगारी जनजागृती सत्र आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या ॲड.चैतन्य भंडारी यांनी भारतातील विविध राज्यांतून आलेल्या डॉक्टरांना तसेच नागरिकांना सायबर सुरक्षेबाबत सविस्तर माहिती दिली.

इंटरनेटचा सुरक्षित वापर — ॲड.भंडारी यांचे मार्गदर्शन
ॲड.चैतन्य भंडारी यांनी इंटरनेटचा सुरक्षित वापर,मोबाईल हाताळताना घ्यायची काळजी,पासवर्ड सुरक्षा,डिजिटल व्यवहारातील रिस्क याबाबत उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले.

फसवणूक करणाऱ्या लिंकापासून सावध
आजकाल सायबर गुन्हेगार जुनी पॉलिसी अपडेट, बँक खाते पडताळणी, KYC अपडेट या नावाखाली नागरिकांच्या मोबाईलवर फसवणूक करणाऱ्या लिंक पाठवतात, असे सांगत ॲड.चैतन्य भंडारीं यांनी आर्थिक फसवणुकीपासून बचावासाठी आवश्यक खबरदारी उपाय स्पष्ट केले.

एआयचे फायदे–तोटेही सांगितले समजावून
भविष्यात झपाट्याने वाढणाऱ्या Artificial Intelligence (AI) चा समाजावर होणारा परिणाम, त्याचे फायदे आणि संभाव्य धोके याबाबतही ॲड.भंडारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आयोजन
हा उपयुक्त सायबर जनजागृती कार्यक्रम डॉ.प्रवीण जोशी आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या पुढाकारातून यशस्वीरीत्या पार पडला.
,






