केंद्रीय क्रीडा महोत्सव 2025 मध्ये पंढरपूरची जोरदार कामगिरी

केंद्रीय क्रीडा महोत्सव 2025 मध्ये पंढरपूरची जोरदार कामगिरी

वैष्णवी लामतुरेची तुफानी धाव — 400×100 मध्ये ब्राँझ

खो-खो अश्मवेद संघात वैष्णवीची चमकदार एन्ट्री

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक येथे पार पडलेल्या केंद्रीय क्रीडा महोत्सव 2025 मध्ये पुणे, नाशिक, अमरावती, कोल्हापूर, नांदेड, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला.

या स्पर्धेत के.बी.पी.कॉलेज पंढरपूर येथून निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी लक्षणीय कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

पंढरपूरचा अभिमान – वैष्णवी लामतुरे

पुणे विभागातून निवड झालेल्या कु.वैष्णवी उत्तम लामतुरे हिने 400×100 रिले स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावत शानदार यश मिळवले. तसेच खो-खो (अश्मवेद) संघासाठी तिची निवड नांदेड येथे झाली असून, पुढील सामन्यांसाठी ती सज्ज झाली आहे.

विद्यापीठ व कॉलेज तर्फे अभिनंदन

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, पंढरपूर तसेच के.बी.पी. कॉलेज पंढरपूर येथील विद्यार्थ्यांनी केलेल्या यशस्वी प्रदर्शनाबद्दल महाविद्यालयीन व्यवस्थापन व मार्गदर्शकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Back To Top