तनाळी येथे श्री दत्त जयंती उत्सवाची भक्तीमय धामधूम

तनाळी येथे श्री दत्त जयंती उत्सवाची भक्तीमय धामधूम

विविध धार्मिक कार्यक्रमांनी परिसरात पुण्यधारा

तनाळी,ता.पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज –सालाबादप्रमाणे यंदाही श्री स.स.रत्नाकर महाराज यांच्या आशिर्वादाने व मठाधिपती श्री स.स.शिवाजी महाराज यांच्या कृपाछत्राखाली श्री माधवानंद प्रभू आश्रम, तनाळी येथे श्री दत्त जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५ या कालावधीत श्री.रत्नाकर महात्म्य आणि दासबोध पारायण व्यासपीठाचे चालक मच्छिंद्र सरगर महाराज नाझरे यांच्या उपस्थितीत पारायणाचा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमाचे अन्नदाते म्हणून –
अंबादास शामराव रोंगे खर्डी, जयराम शिवराम गवळी कासेगाव, विलास आबा सरगर नाझरे, बाळासो कृष्णदेव बंडगर अनकढाळ, तानाजी आलदर सांगली, पोपट चिंतामणी हाके खर्डी आणि संजय गोडसे मा.सरपंच, खिलारवाडी यांचे सहकार्य लाभले आहे.

मुख्य कार्यक्रम :

०३ डिसेंबर : संध्याकाळी विणापूजन — श्रीमंत गोवर्धन पवार व पवार सर शिरभावी यांच्यावतीने भोजन व्यवस्था करण्यात आली आहे.
०४ डिसेंबर : संध्याकाळी ६ वा. तनाळी येथील श्री दत्त मंदिरात पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.
रात्री — श्री स.स. रत्नाकर महाराज समाधी मंदिर येथे मधुकर नामदेव शिंदे कासेगाव यांच्यावतीने भोजन व रात्रभर भजन, कीर्तन,सोंगी भारुड.
०५ डिसेंबर : पहाटे समाधीस अभिषेक व महापूजा.
सकाळी ११ वा.श्री स.स.शिवाजी महाराज यांचे अमृततुल्य प्रवचन.
दुपारी १२ वा. रघुनाथ भिमराव वाघमोडे यांच्यावतीने महाप्रसाद आहे. यानंतर कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

या सर्व कार्यक्रमांचे आयोजन समस्त भक्त मंडळ, इंचगिरी संप्रदाय व तनाळी मठ प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले असून भक्तगणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Back To Top