खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नांतून प्रभाग १५ जुनी लक्ष्मी चाळ रस्ता कामासाठी १७ लाखांचा निधी मंजूर – भूमिपूजन संपन्न
सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७ नोव्हेंबर २०२५- सोलापूर लोकसभा खासदार प्रणिती शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे सोलापूर महानगरपालिका व महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत प्रभाग क्र.१५,जुनी लक्ष्मी चाळ येथे रस्ता विकासकामासाठी १६ लाख ९४ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.या कामाचे भूमिपूजन खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले.

जुनी लक्ष्मी चाळ ही मिल कामगारांची वस्ती म्हणून ओळखली जाते.अनेक दशकांपासून मूलभूत सुविधांची कमतरता भासणाऱ्या या भागातील रस्ता विकास कामांमुळे स्थानिकांच्या तातडीच्या गरजांना दिलासा मिळणार आहे.
या कार्यक्रमास माजी नगरसेवक चेतन नरोटे,विनोद भोसले,माजी नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे, ज्येष्ठ नेते किसन मेकाले गुरुजी,युवा नेते जॉन फुलारे, काँग्रेस शहर कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार,ज्येष्ठ नेते बसवराज म्हेत्रे, युवक काँग्रेसचे गणेश डोंगरे,पृथ्वीराज नरोटे, विराज फुलारे,सुशीलकुमार म्हेत्रे यांच्यासह परिसरातील नागरिक बंधु भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी नागरिकांनी परिसरातील ड्रेनेज लाईनची तातडीची समस्या मांडली. नागरिकांच्या मागणीवर तत्पर प्रतिसाद देत खासदार प्रणिती शिंदे यांनी ड्रेनेज लाईनसाठी ताबडतोब निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. त्यामुळे या भागातील अनेक वर्षांपासूनच्या अडचणींचा शेवट होणार असल्याचा विश्वास रहिवाशांनी व्यक्त केला.
रस्ता कामासाठी निधी मिळवून दिल्या बद्दल चेतन नरोटे,विनोद भोसले,श्रीदेवी जॉन फुलारे आणि किसन मेकाले गुरुजी यांनी खासदार प्रणिती शिंदे यांचे मनःपूर्वक आभार मानले.जुन्या वस्त्यांकडे दुर्लक्ष झालेल्या समस्या सोडवण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद आहे,असे त्यांनी सांगितले.

निधी मंजुरीनंतर संबंधित विभागाला काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रस्ता तयार झाल्यानंतर वाहतुकीची सोय सुकर होईल, पावसाळ्यातील गैरसोयी दूर होतील आणि परिसराचा सर्वांगीण विकास वेग घेईल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.

जुनी लक्ष्मी चाळ परिसरातील रहिवाशांनी खासदार प्रणिती शिंदे व नगरसेवकांच्या प्रयत्नांचे कौतुक करत या विकासकामांचे मनापासून स्वागत केले.





