परभणीत राज्यस्तरीय शालेय खो-खो स्पर्धेची यशस्वी सांगता; लातूर व कोल्हापूर विभाग आघाडीवर

परभणीत राज्यस्तरीय शालेय खो-खो स्पर्धेची यशस्वी सांगता; लातूर व कोल्हापूर विभाग आघाडीवर

14 वर्षाखालील राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत लातूर व कोल्हापूरचा दबदबा; परभणीमध्ये जल्लोषात बक्षीस वितरण

परभणी,दि.19 नोव्हेंबर /जिमाका- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा खो-खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय 14 वर्षाखालील मुला-मुलींची शालेय खो-खो स्पर्धा आज यशस्वीपणे संपन्न झाली. 17 ते 19 नोव्हेंबरदरम्यान श्री शिवाजी महाविद्यालय परभणी येथे या स्पर्धा पार पडल्या.

अमरावती, लातूर, नागपूर, कोल्हापूर, मुंबई, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या विभागांतील मुला- मुलींच्या संघांनी स्पर्धेत उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन केले. तीन दिवस चाललेल्या या शित्तथरारक सामन्यांमध्ये खेळाडूंनी दमदार चाली, वेगवान डावपेच आणि प्रत्येक पॉईंटसाठी झुंज देत प्रेक्षकांची दाद मिळवली.

समारोप प्रसंगी बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी सहसंचालक क्रीडा व युवक सेवा संचालनालय चंद्रकांत कांबळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस व छत्रपती पुरस्कार विजेते डॉ. चंद्रजित जाधव, संचालिका ज्ञानसाधना प्रतिष्ठान शितल किरण सोनटक्के आणि जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे उपस्थित होत्या.

अंतिम निकाल — मुले

प्रथम: लातूर विभाग
द्वितीय: पुणे विभाग
तृतीय: परभणी विभाग
उत्कृष्ट संरक्षण: विक्रमसिंह राठोड (पुणे)
उत्कृष्ट आक्रमण: प्रफुल्ल वसावे (लातूर)
अष्टपैलू खेळाडू: सुरेश वसावे (लातूर)

अंतिम निकाल — मुली

प्रथम: कोल्हापूर विभाग
द्वितीय: पुणे विभाग
तृतीय: लातूर विभाग
उत्कृष्ट संरक्षण: ऋतुजा सुरवसे (पुणे)
उत्कृष्ट आक्रमण: पायल तामखडे (कोल्हापूर)
अष्टपैलू खेळाडू: अनुष्का तामखेडे (कोल्हापूर)
प्रथम क्रमांक संघांना अमोल धाडवे, सौम्या इंटरप्रायजेस यांच्याकडून बॅग
द्वितीय क्रमांक संघांना कै. रामदास कांबळे, कै. मनोहर साखरे यांच्या स्मरणार्थ पाण्याच्या बाटल्या
तृतीय क्रमांक संघांना कै. कलाबाई कांबळे, कै. मंदाकिनी साखरे यांच्या स्मरणार्थ स्किपिंग रोप देण्यात आले.

या क्रीडा स्पर्धेत राज्यातील अमरावती, लातूर, नागपूर, कोल्हापूर, मुंबई, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या आठ विभागांतील 08 मुलांचे व 08 मुलींचे असे एकूण 16 संघ सहभागी झाले होते.

स्पर्धा यशस्वी करण्यात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील कल्याण पोले, तालुका क्रीडा अधिकारी, मिलिंद साळवे, तालुका क्रीडा अधिकारी, सुयश नाटकर, क्रीडा अधिकारी, रोहन औढेकर, क्रीडा अधिकारी, रमेश खुने, वरिष्ठ लिपीक, गजानन तुडमे, कनिष्ठ लिपीक, मथुरा काथार, सिपाही, पंडित चव्हाण, प्रकाश पंडित, धिरज नाईकवाडे, योगेश आदमे आदीनी परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश टाकळे तर आभार प्रदर्शन संजय मुंढे राज्य क्रीडा मार्गदर्शक यांनी केले.

Leave a Reply

Back To Top