अहमदाबादमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये दिल्या जाणाऱ्या सांबारमध्ये मृत झुरळ आढळून आले, त्यानंतर स्थानिक नागरी संस्थेने हॉटेलचे स्वयंपाकघर 48 तासांसाठी सील केले. अहमदाबाद महानगरपालिकेच्या (एएमसी) अन्न विभागाच्या अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली.
अधिकारी म्हणाले, वस्त्रापूर भागातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित एका कार्यक्रमात पाहुणाऱ्यांना दिलेल्या सांबारात झुरळ आढळले त्यांनी याचा व्हिडीओ बनवला. आणि आमच्या पोर्टलवर औपचारिक तक्रार नोंदवली. तपासणी दरम्यान आम्हाला किचन अस्वच्छ स्थितीत आढळले. आम्ही 48 तासांसाठी स्वयंपाकघर सील केले आहे. स्वयंपाकघराच्या दारावर चिकटवलेल्या 'क्लोजर नोटीस'मध्ये, AMC ने सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी स्वयंपाक क्षेत्र 48 तासांसाठी बंद राहील असे म्हटले आहे .
नोटीसमध्ये इशारा देण्यात आला आहे की जर स्वयंपाकघर सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय पुन्हा उघडल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
Edited by – Priya Dixit
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.