अपघातातील मयत ऊसतोड मजुरांच्या कुटुंबीयांसाठी तत्परता दाखवत प्रणिती शिंदे गेल्या धावून
मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,2 एप्रिल 2024- ऊसतोड करून परत येणाऱ्या मजुरांच्या ट्रॅक्टरला अपघात झाल्याने तीन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना समजताच आमदार प्रणिती शिंदे यांनी तात्काळ चिक्कलगी व शिरनांदगी या गावात जाऊन अंत्यविधीला हजेरी लावली, नातेवाईकांचे सांत्वन केले आणि तातडीने आर्थिक मदत दिली.
ऊसतोड कामगार ऊसतोडणीसाठी गुरुदत्त सहकारी साखर कारखाना शिरोळ येथे गेले होते.यंदाचा गळीत हंगाम संपवून काही मजूर गावाकडे जात होते. सोमवारी मध्यरात्री 2 च्या सुमारास त्यांच्या ट्रॅक्टरमध्ये बिघाड झाला. त्यामुळे ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला उभे करून दुरुस्त केला जात होता. तेवढ्यात पाठीमागून येणाऱ्या आंध्र प्रदेशातील एका ट्रकने त्यांना जोराची धडक दिली.
या अपघातात शालन दत्तात्रय खांडेकर (30, रा.शिरनांदगी), जगमा तम्मा हेगडे (35), दादा आप्पा ऐवळे (17), निलाबाई परशुराम ऐवळे, (रा.चिक्कलगी) यांचा जागीच मृत्यू झाला.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.
ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------