अत्याधुनिक सुसज्ज रुग्णवाहिका म्हसवड परिसरातील रुग्णांच्या सेवेसाठी अर्पण

रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा….Offering state-of-the-art ambulance service to patients in Mhaswad area

म्हसवड – महाराष्ट्रातील पहिले लोकसहभागातून सुरू असलेले आम्ही म्हसवडकर कोविड हाॅस्पिटल येथे रोटरी क्लब ऑफ पुणे डाऊन टाऊन , रोटरी डि ३१३१ यांचे वतीने आणि ग्रेट सॉफ्टवेअर लॅबोरेटरी प्रा. लि. पुणे ( GS Lab ) व फ्रिमेसन ऑफ द लेझ्ली विल्सन लॉज ४८८० E C यांचे आर्थिक सहयोगातून आणि कै.श्री.विठ्ठल बाबुराव पोरे यांचे स्मरणार्थ वैभव विठ्ठल पोरे यांचे कडून आम्ही म्हसवडकर ग्रुप संचलित कोवीड सेंटर ( DCHC ) यांस अत्याधुनिक सर्व सोयींनी सुसज्ज रुग्णवाहिका म्हसवड ता. माण जि. सातारा व परिसरातील रुग्णांचे सेवेसाठी अर्पण करण्यात आली.

असिस रे अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ पुना डाऊन टाऊन,शरद दुबे जी एस लॅब्ज प्रा.लि.पुणे, यझदी बाटलीवाला रोटरी क्लब ऑफ पुणा डाऊन टाऊन, जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई, एपीआय बाजीराव ढेकळे ,वैभव पोरे,डॉ.प्रमोद गावडे, डॉ.रोहन मोडासे,नितीन दोशी,डॉ.काकडे, डॉ.वाघचौरे, डॉ.शेळके मॅडम, रासपचे नेते सचिन होनमाने ,कारखेल चे सरपंच शशिकांत गायकवाड यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

यावेळी आम्ही म्हसवडकर ग्रुपचे सदस्य युवराज सुर्यवंशी, एल.के.सरतापे,कैलास भोरे,राहुल मंगरुळे, अँड.अभिजीत केसकर,डॉ.राजेंद्र मोडासे, विजय धट, महेश सोनवले, डॉ.राजेश शहा,संजय टाकणे,प्रितम तिवाटणे, धनंजय पानसांडे, प्रशांत दोशी,खंडेराव सावंत, आदित्य सुकरे,शैलेश केंगार, सुहास भिवरे यांनी रुग्णवाहिकेचा स्विकार केला.

या कार्यक्रमासाठी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री.जंगम सर,महिंद्रा शोरुमचे श्री.चिंचकर ,श्री. ढोले ,बंटी माने,सिध्देश्वर पोरे,गणेश माने, अविनाश मासाळ,कोविड सेंटर चे कर्मचारी आदी उपस्थित होते.


त्यानंतर रुग्णवाहिका पुजन करणेसाठी श्री सिध्दनाथ मंदिर येथे आणण्यात आली.मंदिराचे सालकरी कृष्णात नाळे, मठाधिपती श्री रविनाथ महाराज, श्रीमंत अजितराव राजेमाने यांचे हस्ते पुजन करण्यात आले.यावेळी तेजसिंह राजेमाने,अरिंजय शहा,अजित व्होरा,संतोष दोशी, तेजस व्होरा,भरत सावंत तसेच शहरातील नागरिक उपस्थित होते.

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: