कोथळी कुपनवाडीत प्रथमाचार्य शांतिसागर महाराजांचा पुण्यतिथी महामहोत्सव
कोथळी कुपनवाडीत प्रथमाचार्य शांतिसागर महाराजांचा पुण्यतिथी महामहोत्सव Punyatithi Mahamahotsav of Prathamacharya Shantisagar Maharaj at Kothali Kupanwadi

कसबेडिग्रज /प्रतिनिधी : दक्षिण भारत जैन सभा , वीर सेवा दल मध्यवर्ती समितीच्यावतीने प्रथमाचार्य शांतिसागर महाराजांचा ६६ वा पुण्यतिथी महामहोत्सव कोथळी कुपनवाडी , जि. बेळगाव येथे बुधवारी दि .०८/०९/२०२१ होणार आहे .
यावेळी शांतिसागर महाराजांच्या परंपरेतील पंचम पट्टाधिश आचार्य वर्धमानसागर महाराज संघस्थ त्यागीगण व जिनसेन भट्टारक महास्वामी यांचे सान्निध लाभणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून पुण्यतिथी महोत्सव साजरा होणार आहे.
या कार्यक्रमाचे फेसबुक लाईव्ह होणार असल्याची माहिती वीर सेवा दलाचे अध्यक्ष शशिकांत राजोबा यांनी दिली आहे . कोथळी कुपनवाडी येथे सकाळी दीप प्रज्वलन, णमोकार महामंत्र जाप्य,विश्वशांती प्रार्थना ,अंतिम आदेश उपदेशाचे वाचन,पंचामृत अभिषेक , प्रतिमापूजन , अर्घ्य समर्पण अशा धार्मिक वातावरणात पुण्यतिथी होणार आहे . मात्र कोरोना पार्श्वभूमीवर उपस्थितीतांसाठी निर्बंध असल्याने स्थानिक पातळीवर पुण्यतिथी महोत्सव साजरा करावा , असे आवाहन वीर सेवा दलाच्यावतीने करण्यात आले आहे .