श्रावण सोमवार समाप्ती निमीत्त श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या मंदिरात फुलांची आरास

श्रावण सोमवार समाप्ती निमीत्त श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या मंदिरात फुलांची आरास Flower arrangement in the temple of Mother Vitthal Rukmini on the occasion of Shravan Monday
छाया – सतीश चव्हाण
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील फुलांची आकर्षक आरास व्हिडिओ
 पंढरपूर, ०६/०९/२०२१/नागेश आदापूरे - आज सोमवार दि .०६/०९/२०२१ रोजी श्रावण कृ १४/१५ , श्रावण सोमवार समाप्ती निमीत्त श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यास तसेच सोळखांबी येथे फुलांची आकर्षक आरास करण्यात आली आहे . 

    त्यामुळे श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यासह मंदिरात फुलांच्या सजावटीमुळे मनमोहक स्वरूप प्राप्त झाले आहे .ही फुलांची आरास करणारे भाविक युवराज शरण्णाप्पा मुचलंबे,दाळे गल्ली,पंढरपूर हे आहेत.झेंडू,गुलछडी,गुलाब, लिली इत्यादी फुलांचे प्रकार व रंगसंगती वापरून आरास करण्यात आली आहे. आरास करण्याकरिता साधारणतः १५०० किलो फुले वापरण्यात आली.ही आरास साई डेकोरेटर्स शिंदे ब्रदर्स फ्लॉवर्स ,पंढरपूर या डेकोरेटर्सनी केली आहे अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली .  

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: