पाठ्यपुस्तकात ‘कुराण’ हाती घेतलेल्या दहशतवाद्याचा फोटो, तेलंगणात गदारोळ


हायलाइट्स:

  • ‘इस्लामोफोबिक’ फोटोवर विद्यार्थी संघटनेकडून आक्षेप
  • कंटेन्ट हटवण्याचे तेलंगणा सरकारचे आदेश
  • ‘पाठ्यपुस्तकांतून विद्यार्थ्यांना शांतीचे धडे दिले जायला हवेत’

हैदराबाद :इस्लामिक कट्टरतावाद‘ दर्शवण्यासाठी एका हातात हत्यार आणि दुसऱ्या हातात ‘कुराण’ असलेल्या एका दहशतवाद्याचा फोटो पाठ्यपुस्तकात वापरण्यात आल्याचं समोर आल्यानंतर तेलंगणात एकच गदारोळ उठलाय.

इयत्ता आठवीच्या समाजशास्त्र (इंग्रजी माध्यम) विषयाच्या पुस्तकातील ‘प्रश्न बँके’त या फोटोचा वापर करण्यात आला आहे. मात्र, ही बाब समोर आल्यानंतर तत्काळ हा कंटेन्ट हटवण्याचे आदेश तेलंगणा सरकारनं दिले आहेत.

इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकात ‘इस्लामिक कट्टरतावाद’ दर्शवण्यासाठी वापरण्यात आलेला हा फोटो तत्काळ हटवण्याची मागणी ‘स्टुडंटस् इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया‘ (SIO) कडून करण्यात आली होती. पाठ्यपुस्तकात विद्यार्थ्यांसमोर चुकीची प्रतिमा तयार होत असल्याचं सांगत एसआयओनं या फोटोला तीव्र विरोध केला आहे.

या फोटोत एक दहशतवादी आपल्या उजव्या हातात एक रॉकेट लॉन्चर घेऊन उभा आहे तर दुसऱ्या हातात मुस्लीम पवित्र ग्रंथ ‘कुराण’ची प्रत असलेली दिसतेय. हा फोटो ‘राष्ट्रीय आंदोलन – अंतिम चरण १९१९ – १९४७’ अध्यायात प्रकाशित करण्यात आलं होतं.

bharat bandh : ‘हा भारत बंद तालिबानी, शेतकरी आणि अर्थव्यवस्थेचे नुकसान करणारा’
VIDEO: आंदोलनात घुसू पाहणाऱ्या काँग्रेस नेत्याला शेतकऱ्यांनी दाखवला घरचा रस्ता
एसआयओ या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉ तल्हा फैयाजुद्दीन यांनी अशा प्रकारे ‘इस्लामोफोबिक‘ कंटेन्ट तयार करून प्रकाशित करणाऱ्या प्रकाशकाची निंदा केलीय. त्यांनी राज्याचे शिक्षणमंत्री पी. सबिता इंद्रा रेड्डी यांच्याकडे बेजबाबदार प्रकाशकावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केलीय.

अशा प्रकारचा कंटेन्ट ‘मुस्लीम समाजाप्रती रुढीवादी, घृणास्पद आणि इस्लामोफोबिक दृष्टिकोण निर्माण आणि प्रचार करणारा’ असल्याचं डॉ. फैयाजुद्दीन यांनी म्हटलंय. शैक्षणिक संस्था आणि पाठ्यपुस्तकांतून विद्यार्थ्यांना शांतीचे धडे दिले जायला हवेत, यावर त्यांनी जोर दिला.

पाठ्यपुस्तकातील हा मजकूर त्वरीत हटवून ही पुस्तकं नव्यानं प्रकाशित करण्यात यावीत, अशी मागणी एसआयओकडून करण्यात आलीय.

Bhawanipur Bypoll 2021: तृणमूलकडून दिलीप घोष यांच्यावर हल्ला, भाजपचा दावा
Farmers Protest: ‘भारत बंद’ दरम्यान सिंघु सीमेवर शेतकऱ्याचा मृत्यू



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: