सोलापूर टिळक चौक येथे माजी पालकमंत्री आ.विजयकुमार देशमुख यांनी केली पाहणी

सोलापूर टिळक चौक येथे माजी पालकमंत्री आ.विजयकुमार देशमुख यांनी केली पाहणी Former Guardian Minister MLA Vijay Kumar Deshmukh inspected at Tilak Chowk, Solapur

सोलापुर – कोरोनाच्या नियमांचे पालन करून व महाराष्ट्र शासनाच्या आदेशाचे पालन करून गणेश मुर्ती विक्री व पूजा साहित्य, मिठाई विक्री, स्टॉल, मंडप व स्टेज मारण्यास परवानगी देण्यात यावी. गेल्यावर्षी देखील कोरोनाच्या काळामध्ये गणेश मुर्ती विक्री व पूजा साहित्य, मिठाई विक्री, स्टॉल, मंडप व स्टेज मारण्यास परवानगी देण्यात आली होती त्याच धर्तीवर याही वर्षी परवानगी देण्यात यावी सोमवारी संध्याकाळपर्यंत निर्णय देण्यात यावा अश्या सूचना माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी महापालिका आयुक्त पी.शिवशंकर यांना पाहणी वेळी दिल्या.

टिळकचौक येथे गणेश मुर्ती विक्री व पुजा साहित्य विक्री करण्याकरीता मंडप घालण्याचे व्यापारी असोसिएशनने निवेदनाद्वारे परवानगी मागितलेली होती. या संदर्भाला वरीष्ठ पोलीस निरीक्षक फौजदार चावडी पोलीस ठाणे व शहर वाहतूक पोलीस निरीक्षक यांना अभिप्रायाकरीता पत्र दिल्यानंतर वाहतुकीचा मार्ग अरुंद असल्याने व कोराना प्रादुर्भावाचे नियमाचे उलंघन होईल या करीता परवानगी नाकारल्याने या संदर्भात लोकमान्य टिळक चौक , हलवाई गल्ली वेलफेअर असोसिएशनची आयुक्तांच्या दालनामध्ये सभागृह नेते शिवानंद पाटील यांनी घेतली होती.

कोरोना काळामध्ये व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान झालेले आहे आता कुठे व्यवसाय सुरू झाले असून या वर्षी प्रशासनाकडून परवानगी नाकारल्याने व्यापारी चिंतेत आहेत.मागच्या वर्षी ज्या पद्धतीने नियम व अटी घालून परवानगी देण्यात आलेली होती त्या पद्धतीने टिळक चौकातील व्यापाऱ्यांना गणेश मूर्ती, लक्ष्मी मुखवटे, सजावट साहित्य, स्टॉलला परवानगीचा निर्णय संध्याकाळपर्यंत देण्यात येईल अशी आयुक्तांनी माहिती दिल्याची माहिती सभागृहनेते शिवानंद पाटील यांनी दिली.

     माजी पालकमंत्री आ.विजयकुमार देशमुख, सभागृहनेते शिवानंद पाटील, पालिका आयुक्त पी.शिवशंकर, नगरसेवक अमर पदाले यांनी लोकमान्य टिळक चौक येथे गणेश मूर्ती स्टॉल येथे पाहणीसाठी गेले होते. यावेळी हलवाई गल्ली वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष व यांनी सर्वांचे आभार मानले व कोरोनाच्या नियमांचे पालन करून व महाराष्ट्र शासनाच्या आदेशाचे पालन करून गणेश मुर्ती विक्री व पूजा साहित्य, मिठाई विक्री, स्टॉल, मंडप व स्टेज मारण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली.

 यावेळी सभागृहनेते शिवानंद पाटील,लोकमान्य टिळक चौक, हलवाई गल्ली वेलफेअर असोसिएशनचे भैय्या दास, नगरसेवक अमर पुदाले,उत्तमराव डोईजोडे, कांतीलाल धोत्रे, भगवान बांगडीया, बंडू सिद्धे, गणेश दास, संजय दास, उमेश डोईजोडे, भारत मंठाळकर, गोलानी शेटजी, नळे बंधू, लक्ष्मीकांत सिद्धे, मोहित शेटजी, अशोक खडलोया आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: