महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीच्यावतीने नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्याबाबत नगरपालिका संचालक यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा

महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीच्यावतीने नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्याबाबत नगरपालिका संचालक यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा On behalf of Maharashtra State Municipal Council Employees Coordinating Committee, positive discussions with the Municipal Director regarding various demands of the Municipal Council employees

पंढरपूर - महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीच्यावतीने नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत 1 सप्टेंबर पासून काम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला  होता परंतु याबाबत नगरपालिका प्रशासन संचालनालय वरळी मुंबई येथे आयुक्त तथा संचालक डॉ किरण कुलकर्णी ,संभाजी वाघमारे , कैलास गावडे ,शीला पाटील यांच्यासमवेत समन्वय समितीची राज्याचे अध्यक्ष डॉ डी एल कराड ,जनरल सेक्रेटरी सुनील वाळुजकर, पुणे विभागाचे अध्यक्ष प्राचार्य ए बी पाटील, कार्याध्यक्ष धनंजय पळसुले, रामदास पगारे,गणेश शिंदे , मिलिंद वेदपाठक या शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा झाली. 

    यावेळी झालेल्या चर्चेमध्ये महाराष्ट्रातील नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. राज्यातील नगरपरिषद यांचा नवीन आकृतीबंध हा 2005 तयार करण्यात आला होता वेळोवेळी त्यास मुदतवाढ देण्यात आली होती.याबाबत एक समिती स्थापित करण्यात आली असून या समितीद्वारे सूचना व हरकती मागवून नवीन आकृतिबंध व त्यातील वाढीव  पदे मंजूर करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल. डॉ बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेअंतर्गत राज्यातील सफाई कर्मचाऱ्यांना मोफत घरे बांधून देण्याबाबतचा आदेश व निर्णय यापूर्वी शासनाने घेतलेला आहे त्याप्रमाणे नगरपालिकेचा आढावा घेऊन  निश्चितपणे सफाई कर्मचाऱ्यांना मोफत घरे बांधून देण्याचा प्रस्ताव व निधी मंजूर करण्यात येईल असे आश्वासन या झालेल्या चर्चेच्या संचालक यांनी या वेळी दिले तसेच यापुढे पूर्वीचे व नव्याने काढण्यात येणारे नगरपालिका संचालनालय यांची आदेश निर्देश हे वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येतील असे सांगितले. 

    महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीच्या सर्व मागण्यावर प्रथमच आयुक्त तथा संचालक डॉ किरण कुलकर्णी व इतर उपायुक्त यांनी वेळ देऊन प्रत्येक मागणीची बारकाईने विचार व चर्चा  करून मार्ग काढण्यासाठी काय करावे लागेल याबाबत मार्गदर्शन केलं व लवकरच सर्व मागण्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा निर्णय घेतला म्हणून सुनील वाळूजकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: