मुदस्सर कादिर कुरेशी सोलापूर व धाराशीव जिल्ह्यातून ०२ वर्षाकरीता तडीपार
सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज – मुदस्सर कादिर कुरेशी,वय ३१ वर्षे,रा.घर नं.८४४,कुरेशी गल्ली,दक्षिण कसबा,साखर पेठ, सोलापूर याचेविरुध्द सन २०१३ ते २०२४ या कालावधी. मध्ये,गैरकायद्याची मंडळी जमा करुन दंगा करणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, सरकारी नोकरांचे कामात अडथळा निर्माण करणे,अवैधरित्या गोवंशीय जनावरांची वाहतूक करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याचेविरुध्द विजापूर नाका पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उप- आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता.
सदर प्रस्तावाचे अनुषंगाने पोलीस उप- आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे सोलापूर शहर यांनी कार्यवाही करुन त्यांचेकडील तडीपार आदेश क्र.८९८/२०२४ दि. ०१/०४/ २०२४ अन्वये मुदस्सर कादिर कुरेशी,वय ३१ वर्षे, रा. घर नं. ८४४, कुरेशी गल्ली, दक्षिण कसबा, साखर पेठ, सोलापूर यास सोलापूर जिल्हा व धाराशीव जिल्हा येथून दोन वर्षाकरीता दि.०३/०४/२०२४ पासून तडीपार केले आहे. त्यास तडीपार केल्यानंतर इंदापूर पुणे येथे सोडण्यात आले आहे.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.
ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------