झाडे लावा झाडे जगवा आणि पर्यावरण वाचवा – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले

झाडे लावा झाडे जगवा आणि पर्यावरण वाचवा – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले Plant trees, save trees and save the environment – Union Minister of State Ramdas Athawale
पर्यावरण दिनी रिपाइंच्या पर्यावरण आघाडीची स्थापना

मुंबई दि. 5 – कोरोना च्या वर्षभराच्या काळात प्राणवायू ऑक्सिजन ची किती गरज आहे हे सर्वांच्या लक्षात आले आहे. प्राणवायू देणारी वृक्षवल्ली आपण वाचविली पाहिजे. निसर्ग पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे.संवर्धन केले पाहिजे.त्यासाठी झाडे लावा, झाडे जगवा ,निळा भगवा, झाडे जगवा असे आवाहन आज जागतिक पर्यावरण दिनी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले.अलियावर जंग इन्स्टिट्यूट बांद्रा पश्चिम येथे ना.रामदास आठवले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

त्यापूर्वी सकाळी नवी मुंबईमधील महापे येथील राम फॅशन कंपनी आवारात ना रामदास आठवले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आणि  हॉटेल फॉर्च्युन,वाशी येथे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत रिपब्लिकन पक्षाच्या पर्यावरण आघाडीची स्थापना करण्यात आली. त्याच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी विजय ढमाले , महाराष्ट्र अध्यक्षपदी अशोक गायकवाड ,मुंबई अध्यक्षपदी विजय शेट्टी,नवी मुंबई अध्यक्षपदी  यशपाल ओव्हाळ आदींची नियुक्ती करण्यात आली. 

  झाडे नुसती लावू नका तर ती झाडे जगविण्या कडे लक्ष द्या.पर्यावरण वाचविण्यासाठी दक्ष राहा, निसर्गाचे मित्र व्हा,शहरांमध्ये वृक्षसंपदा टिकवा , आपल्या परिसरात झाडे लावा.प्रत्येकाने झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्याचा निर्धार करावा असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: