श्री माताजी निर्मलादेवी प्राथमिक उच्च प्राथमिक विद्यामंदिर शाळेत मतदान जागृती अभियान अंतर्गत पालकांना पत्र

श्री माताजी निर्मलादेवी प्राथमिक उच्च प्राथमिक विद्यामंदिर शाळेत मतदान जागृती अभियान अंतर्गत पालकांना पत्र

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज :- श्री माताजी निर्मलादेवी प्राथमिक उच्च प्राथमिक विद्यामंदिर पंढरपूर शाळेत मतदान केंद्र आहे.या शाळेच्या केंद्रावर मतदान जागृती अभियान राबविण्यात आले.आपल्या भारतीय लोकशाहीच्या उत्सवात कुटुंबातील १८ वर्ष पूर्ण झालेल्या नागरीकांना पत्रलेखन करून ७ मे सोमवार रोजी मतदान करण्याचे आवाहन केले.यावेळी ४ थी च्या बालमित्र अर्णव,श्लोक,आरोही, संचिता,तेजस्विनी यांनी आपले पत्र वाचून माहिती दिली.

याप्रसंगी श्री रुक्मिणी विद्यापीठ पंढरपूर संस्थापिका सचिवा सौ.सुनेत्राताई पवार सो यांनी मुलांना व पालकांना म्हणाल्या, लोकशाही बळकट व समृद्ध करण्यासाठी आपले एक मत महत्त्वाचे आहे.आपले मतदान, हा आपला पवित्र हक्क आहे.तो बजावणे आणि भारताची लोकशाही जिवंत ठेवणे हे आपले कर्तव्य आहे.

यावेळी मुलांना मतदान यंत्राबद्दल व मतदान का करावे याबद्दल माहिती मुख्याध्यापक संतोष कवडे सर व श्री टापरे सर यांनी मतदान यंत्रावर शेवटचे बटन कशाचे असते याबद्दल सखोल माहिती सांगितली. हा उपक्रम राबवण्यासाठी वर्गशिक्षक महेश भोसले सर यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *