केळवा व सफाळे पोलीस ठाणे यांचेकडून अवैद्यरित्या रेती उत्खनन करणा-या आरोपींवर कारवाई Kelwa and Safale Police Thane take action against the accused for illegal sand mining
पालघर - केळवा व सफाळे पोलीस ठाणे यांचेकडून अवैद्यरित्या रेती उत्खनन करणा-या आरोपींवर कारवाई करण्यात आली.दि ०६/०९/ २०२१ रोजी सकाळी ०८.३० वाजता सुमारास वैतरणा ब्रिज क्र ९२ चे लगत वैतीपाडा गावचे खाडी किनारी ता.जि.पालघर दक्षिणेस १५ कि.मी./ केळवा बीट क्र. - ३ व मौजे कांदरवन येथे वैतरणा नदी किनारी ता.जि.पालघर येथे यातील आरोपीत यांनी जिल्हाधिकारी पालघर यांचेकडील आदेश अन्वये रेल्वे ब्रिज क्र.९२ व १३ चे २ किलोमिटर कार्यक्षेत्रामध्ये फौजदारी प्रकिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वयेच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करुन शासनाची कोणतीही परवानगी नसताना अनधिकृतपणे विना परवाना रेती उत्खनन करुन पर्यावरणास धोका निर्माण होईल असे कृत्य करुन स्वत:च्या फायद्याकरिता एकुण २१,७८,२७४ / - रुपयांचा मुद्देमाल आरोपीत यांचे ताब्यात मिळुन आला असुन तो तहसीलदार तथा दंडधिकारी, पालघर यांचे समक्ष जागीच नाश करण्यात आला आहे.सदर घटने बाबत आरोपीत यांचे विरुद्ध केळवा सागरी पोलीस ठाणे , सफाळा पोलीस ठाणे सह जमीन महसुल अधिनियम, पर्यावरण अधिनियम प्रमाणे दि. ०६/०९/२०२१ रोजी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत .
सदरची कारवाई उपविभागीय दंडाधिकारी धनाजी तोडसकर पालघर , तहसीलदार तथा दंडाधिकारी सुनिल शिंदे पालघर तसेच महसुल विभागातील स्टाफ व सपोनि प्रभारी अधिकारी भीमसेन गायकवाड केळवा सागरी पोलीस ठाणे,सपोनि संदीप कहाळे प्रभारी अधिकारी सफाळा पोलीस ठाणे व केळवा व सफाळा पोलीस स्टाफ यांनी संयुक्तरित्या केलेल्या अविश्रांत प्रयत्नांमुळे यशस्वी झाली आहे .
Like this:
Like Loading...