पंढरपूरात किटकजन्य आजार प्रतिबंधासाठी व कोरोना प्रतिबंधासाठी उपाययोजना सुरु

पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर,नागरी हिवताप योजना व आरोग्य विभाग नागरी हिवताप योजना, पंढरपूर आरोग्य विभाग व जिल्हा हिवताप कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने पंढरपूरात किटकजन्य आजार प्रतिबंधासाठी व कोरोना प्रतिबंधासाठी उपाययोजना सुरु Measures started for prevention of insect-borne diseases and corona in Pandharpur

  पंढरपूर - पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर,नागरी हिवताप योजना व आरोग्य विभाग नागरी हिवताप योजना, पंढरपूर आरोग्य विभाग व जिल्हा हिवताप कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने डेंग्यू प्रतिरोध जनजागृती अभियान राबविण्यात आले.डेंग्यू प्रतिरोधासाठी नगराध्यक्ष सौ साधनाताई भोसले ,मुख्यधिकारी अरविंद माळी , जिल्हा हिवताप अधिकारी डॉ एकनाथ बोधले तसेच आरोग्य समिती सभापती विक्रम शिरसाट यांचे मार्गदर्शनाखाली जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.दि ०१ जुलै २०२१ पासून किटकजन्य आजार प्रतिबंधासाठी व कोरोना प्रतिबंधासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत . यासाठी पंढरपूर शहरातील सर्व १७ प्रभागामध्ये किटकजन्य आजार प्रतिबंधासाठी सर्व घरातील पाणीसाठे तपासण्यात आले .सध्या पावसाळा सुरु असल्याने जागोजागी पाणी साठल्याने जी डबकी तयार होतात त्या डबक्यांवर डासअळी नाशक फवारणी करण्यात येत आहे.कोरोना प्रतिबंधासाठी सर्व सार्वजनिक ठिकाणे,घरे सोडियम हायपोक्लोराईडने फवारणी करण्यात आली.तसेच जीवशास्त्रीय उपाययोजनेत अंतर्गत डासोत्पत्ती ठिकाणाधमध्ये गप्पी मासे सोडण्यात आली आहेत . पंढरपूर शहरातील सर्व मठामध्ये जंतूनाशक फवारणी , धूर फवारणी , डासअळी नाशक फवारणी , कंटेनर सर्वेक्षण तसेच ताप रुग्णाचे रक्त नमुने संकलन इत्यादी कार्यवाही करण्यात येत आहे . 

     डेंग्यू प्रतिरोधाच्या निमित्ताने सर्व पंढरपूर शहारातील व उपनगरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते कि , सध्या पावसाळा सुरु असून आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवावा , घराभोवती साठलेले पाणी ,भंगार साहित्य ,जुने टायर इत्यादी वस्तूची त्वरित विल्हेवाट लावावी तसेच आपल्या घरातील सर्व पाण्याची भांडी ,पिंप ,बँरल ,सिमेंट टाकी इ.स्वच्छ धुऊन पुसून कोरडी करावीत तसेच आठवड्यातून १ दिवस कोरडा दिवस पाळावा . आपल्या घरी सर्वेक्षणासाठी आलेल्या कर्मचारी यांना सर्व माहिती द्यावी . तसेच दुषित आढळलेले सर्व कंटेनर त्वरित रिकामे करावेत अथवा टेमीफॉस द्रावण टाकावे . पंढरपूर शहरामधील खाजगी वैद्यकीय व्यावसायिक व खाजगी प्रयोग शाळा यांना डेंग्यू हा आजार नोटीफायबल डिसीज म्हणून केंद्र व राज्य सरकारने घोषित केले आहे . तरी सर्व खाजगी प्रयोग शाळा व वैद्यकीय व्यावसायिक यांचेकडे डेंग्यू दुषित रुग्ण आढळून आल्यास त्वरित नागरी हिवताप योजना आरोग्य विभाग, नगरपरिषद पंढरपूर या कार्यालयास अवगत करणे बाबत सूचित केले आहे . 

   नगरपरिषद आरोग्य विभागामार्फत आवाहन करण्यात येते की , सर्व नागरिकांनी करोना प्रतिबंधासाठी SMS ( सॅनिटायझर , मास्क सोशल डिस्टन्स ) तसेच आठवड्यातून १ दिवस कोरडा दिवस पाळावा , आपल्या घराभोवतालाचा परिसर स्वच्छ ठेवावा , इतर भंगार , नारळाच्या करवंट्या , निकामी टायर्स यांची त्वरित विल्हेवाट लावावी . ताप आल्यास त्वरित शासकीय दवाखान्यात उपचारासाठी भेट द्यावी असे आवाहन नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले , मुख्यधिकारी अरविंद माळी,सौ श्वेता डोंबे उपनगराध्यक्षा तसेच सर्व सन्माननीय नगरसेवक ,आरोग्य सभापती विक्रम शिरसट नगरपरिषद पंढरपूर तसेच जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.एकनाथ बोधले,आरोग्यधिकारी शरद वाघमारे,जीवशास्त्रज्ञ किरण मंजुळ नागरी हिवताप योजना नगरपरिषद यांचेवतीने करण्यात आले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: