एक वास्तव – गोफणगुंडा

  एक वास्तव :

मृत्युच भय सर्वांनाच असत
पण तो येइतों जगावच लागतं
ते का कोणाच्या हातांत असत ?

मृत्यू कोठे कसं अन केंव्हा येईल हे
सारे अनिश्चित असतं
येई तो कांही खरं नसतं पण
आल्यावर मात्र खरं नसतं

म्हणूनच काळजीनें झुरत मरण्यापेक्षा
कर्तुत्व फुलवत जगावं ते महत्वाचे ठरतं

यासाठीच माणसाने असं जगावं
की गेल्यावरही आपलं नांव
सर्वांच्या मुखात आदरार्थी निघत रहावं !!

      चावडीवरला चिमटा ... 

पत्रकार परिषदेत मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप
हे आता रोजचेच आहे
बातमी ,गवगवा बदनामी निंदानालस्ती,
पुढे कांही घडत नाही
न्यायालयात पुरावे कोण देत नाही
यामुळे कालांतराने लोक विसरतात
भ्रष्टाचारी नव्याने उजळमाथ्याने प्रस्थापित होतात
आम्ही कसे शुद्ध चारित्रसंपन्न कर्तव्यदक्ष
असं सांगत खुर्चीवर तेच येतात
म्हणून आता खेड्यात चावडीवर म्हणतात
“आर इथं कोण सुदीक धुतल्या तांदळाप्रमाण नाय
समंदी साधल्याचं सोबती हायत “
आर वरल त्यांचं हाय पर
खाली त्यांच्या हाती काय
नाय म्हणून हयो कालवा हाय पर
काय बाय खाली देखील नासकी हायती
तवा हे असेच चालायचं
यालाच राजकारण म्हणायचं “!!

            "सुप्रभात"

“शरीर अन मनाचे आरोग्य निर्मळ असेल तर जीवन समर्थ अन सामर्थ्यवान होते .”!!

आनंद कोठडीया,जेऊर
९४०४६९२२००

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: