राजभवनाचे rajbhavan झाले लोकभवन lokbhavan : राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या निर्देशाने ऐतिहासिक नामांतर
१४० वर्षांच्या प्रवासानंतर राजभवनाचे दुसरे नामांतर : जनतेसाठी खुले होण्याची दिशा
केंद्राच्या सूचनेनुसार राजभवनाचे नामांतर : संकेतस्थळावर बदल : गव्हर्नमेंट हाऊस ते लोकभवन : ऐतिहासिक वाटचाल
महाराष्ट्र राजभवनाचे नामांतर लोकभवन असे करण्यात आले असून राज्यपाल आचार्य देवव्रत acharya devavrat यांच्या निर्देशानुसार संकेतस्थळावरही बदल करण्यात आला आहे. १४० वर्षांच्या प्रवासात हे दुसरे नामांतर असून राजभवन अधिक लोकाभिमुख करण्याचा उद्देश व्यक्त केला जात आहे.
rajbhavan mumbai news : मुंबई | ज्ञानप्रवाह न्यूज – केंद्र शासनाच्या सूचनेनुसार महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज महाराष्ट्रातील राजभवनाचे नामांतर लोकभवन lokbhavan करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार राजभवनाच्या अधिकृत संकेतस्थळावरही महाराष्ट्र लोकभवन असा बदल करण्यात आला आहे. लवकरच हा बदल सर्व प्रशासकीय व सार्वजनिक पातळीवर दिसून येणार आहे.या नामांतरामुळे राजभवन अधिक लोकाभिमुख होण्याचा संदेश देण्यात आला असून, जनसामान्य नागरिकांशी शासन यंत्रणेचा थेट संवाद वाढावा, हा यामागील प्रमुख उद्देश असल्याचे मानले जात आहे.
कोश्यारी यांनी केले होते लोकभवनाचे सूतोवाच
दि. १४ जून २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मलबार हिल येथील राजभवनात ब्रिटिश काळात बांधलेल्या बंकरमध्ये उभारण्यात आलेल्या क्रांती गाथा या क्रांतिकारकांच्या दालनाच्या उद्घाटना साठी आले होते.त्यावेळी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन हे केवळ प्रशासकीय निवासस्थान न राहता ते ‘लोकभवन’ व्हावे, अशी संकल्पना मांडली होती.राजभवनात अनेक लोक येतात. माझा प्रयत्न आहे की हे केवळ राजभवन राहू नये तर लोकभवन व्हावे. जनसामान्य नागरिक येथे यावेत,असे उद्गार कोश्यारी यांनी पंतप्रधानांसमोर काढले होते.
१४० वर्षांच्या प्रवासात दुसरे नामांतर
ब्रिटिश राजवटीत सन १८८५ मध्ये गव्हर्नर निवासस्थान परळ येथून मलबार हिल येथे स्थलांतरित झाले. त्या काळात त्याचे नाव ‘Government House of Bombay’ असे होते.
स्वातंत्र्यानंतर या वास्तूला राजभवन असे नाव देण्यात आले.महाराष्ट्र राज्य निर्मिती नंतर ते महाराष्ट्राचे राजभवन म्हणून ओळखले जाऊ लागले.आता जवळपास १४० वर्षांच्या ऐतिहासिक प्रवासानंतर या वास्तूचे महाराष्ट्र लोकभवन असे नामांतर झाले आहे.
या निर्णयामुळे राजभवन अधिक लोकसहभागी,पारदर्शक व जनतेशी जोडलेले केंद्र बनेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
उमेश काशीकर (संदर्भ : जगदीश का.काशिकर,मुक्त पत्रकार मुंबई )