पंढरपूर शहर पोलीस ठाण्यास pandharpur city police सक्षम नेतृत्वाची गरज : नामदेव शिंदे यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करा – आदिम विकास परिषदेची मागणी
गुन्हेगारी व अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी ठोस पाऊल उचला – आदिम विकास परिषद सोलापूर जिल्हा
पंढरपूर शहरातील वाढती गुन्हेगारी व अवैध धंद्यांवर नियंत्रणासाठी पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांची शहर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पदावर नियुक्ती करण्याची मागणी.
Pandharpur news : पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज, दि.१०/०१/२०२६ : देशाची आध्यात्मिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पंढरपूर शहरात वर्षभर मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असते. आषाढी, कार्तिकी, माघी व चैत्री यात्रा काळात लाखो वारकरी पंढरपूरात दाखल होत असतात.याशिवाय श्री विठ्ठल दर्शनासाठी अनेक मंत्री, लोकप्रतिनिधी व राजकीय नेते येथे नियमित भेटी देत असतात.मात्र या पवित्र शहरात गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारी टोळ्यांचे वाढते अस्तित्व,गंभीर गुन्ह्यांचे वेगाने वाढणारे प्रमाण तसेच अवैध धंद्यांचा सुळसुळाट ही बाब चिंतेची ठरत आहे.
प्रशांत डगळे यांनी केलेल्या कारवायांमुळे कायदा-सुव्यवस्थेला बळ
पंढरपूरचे विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी,अवैध व्यवसाय व समाजविघातक कृत्यांवर कारवाया केलेल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी ठोस आणि परिणामकारक पावले उचलल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
शहर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पद रिक्त
सध्या पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले विश्वजीत घोडके यांची बदली झाल्याने सदर पद रिक्त आहे. हे पद तातडीने भरले जाणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत सामाजिक व नागरी संघटनांकडून व्यक्त केले जात आहे.

नामदेव शिंदे यांच्या नियुक्तीची मागणी
या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीण विशेष शाखेत कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक नामदेव गणपतराव शिंदे यांची पंढरपूर शहर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करावी, अशी ठाम मागणी आदिम विकास परिषद सोलापूर जिल्हाध्यक्ष नागेश अधटराव यांनी सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नामदेव शिंदे हे अनुभवी, कर्तव्यदक्ष व शिस्तप्रिय अधिकारी असून त्यांच्या नियुक्तीमुळे पंढरपूर शहरातील कायदा- सुव्यवस्था अधिक सक्षम होईल.
विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित
यावेळी पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष लखन साळुंखे, R.P.I (A) पंढरपूर शहर उपाध्यक्ष अनिल माने ,काँग्रेस सेवादल पंढरपूर शहराध्यक्ष गणेश माने यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
पंढरपूरच्या सुरक्षिततेसाठी ठोस निर्णयाची अपेक्षा
पंढरपूरसारख्या धार्मिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या शहरात कडक आणि प्रभावी पोलीस प्रशासन असणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे रिक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर तातडीने योग्य व अनुभवी अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.






