पंढरपूरच्या उपविभागीय अधिकारीपदी गजानन गुरव
पंढरपूरच्या उपविभागीय अधिकारीपदी गजानन गुरव यांची नियुक्ती Appointment of Gajanan Gurav as Sub-Divisional Officer, Pandharpur
पंढरपूर दि.19 – सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांची पंढरपूर उपविभागीय अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे.
श्री.गुरव यांच्याकडे पंढरपूरचे प्रभारी प्रांताधिकारी म्हणून पदभार होता. दिनांक 17 सप्टेंबर 2021 रोजी शासन आदेशान्वये त्यांची प्रांताधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. कोरोना संसर्गाच्या कालावधीत सर्व नियमांचे पालन करुन 252- पंढरपूर विधानसभा पोट निवडणूकीचे कामकाज यशस्वीपणे पार पाडले.
जानेवारी 2014 ते 2016 या कालावधीत त्यांनी पंढरपूरचे तहसिलदार म्हणून काम पाहिले. या कालावधीत भीमा नदीवरील विष्णूपद बंधारा अवघ्या तीन महिन्यात पुर्ण करण्यासाठी आवश्यक प्रयत्न केले. बाजीराव विहीर आणि त्या लगत असणारी जमीन शासनाच्या ताब्यात घेतली. पंढरपूर तालुक्यातील 11 पुनर्वसीत गावांना गावठाणाचा दर्जा दिला. आषाढी व कार्तिकी वारीत हॅम रेडीओची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.प्रविण गेडाम, तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्कालीन मदत केंद्राची सुरुवात केली. या केंद्रामुळे भाविकांना एकाच ठिकाणी आवश्यक मदत मिळू लागली. तसेच प्रत्येक गावातील तलाठी कार्यालयाच्या ठिकाणी संपर्क क्रमांक व भेटीबाबत माहिती फलक लावले.
विशेष शिबीराचे आयोजन करुन कुळ कायदातंर्गत कलम 43 च्या शर्ती 2 हजार 500 पेक्षा 7/12 वरील शर्ती कमी केल्या. सन 2014 मध्ये झालेल्या गारपीटीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदतीचे वाटप आदी कामे त्यांनी या कालावधीत केली.