जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज :तहसीलदार सचिन लंगुटे

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज : तहसीलदार सचिन लंगुटे

आचारसंहिता लागू : पंढरपूर तालुक्यात ८ जि.प.गट व १६ पं.स.गणांसाठी निवडणूक तयारी पूर्ण : ३०९ मतदान केंद्रांवर होणार मतदान

पंढरपूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ साठी प्रशासन सज्ज झाले आहे. ८ जि.प. गट, १६ पं.स. गण आणि ३०९ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे, अशी माहिती तहसीलदार सचिन लंगुटे यांनी दिली.

Pandharpur ZP PACHAYAT SAMITI Election पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज | दि. १५ जानेवारी २०२६- पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून, निवडणुका पारदर्शक, निर्भय व शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णतः सज्ज असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सचिन लंगुटे यांनी दिली.

सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सचिन लंगुटे

पंढरपूर तालुक्यात जिल्हा परिषदचे एकूण ८ गट आणि पंचायत समितीचे १६ गण असून यासाठी ३०९ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.जिल्हा परिषद गटांमध्ये वाखरी, करकंब, भोसे, गोपाळपूर, टाकळी, कासेगाव, रोपळे व भाळवणी यांचा समावेश आहे तर पंचायत समिती गणांमध्ये उंबरे, करकंब, भोसे, गुरसाळे, रोपळे,सुस्ते,पुळूज, गोपाळपूर, वाखरी, पटवर्धन कुरोली,भाळवणी,पळशी, टाकळी,खर्डी, कासेगाव व सरकोली या १६ गणांचा समावेश आहे.

निवडणूक प्रक्रियेसाठी नामनिर्देशन अर्ज, छाननी,उमेदवारी माघार,निवडणूक चिन्ह वाटप,मतदान दिवशी घ्यावयाची खबरदारी,अनामत रक्कम व मतमोजणी याबाबत सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत.

८ जिल्हा परिषद गटांसाठी ८ कर्मचारी व १६ पंचायत समिती गणांसाठी १६ कर्मचारी नामनिर्देशन अर्ज तपासणीसाठी नियुक्त करण्यात आले आहेत.

आचारसंहिता प्रभावीपणे राबवण्यासाठी पंचायत समिती, शेतकी भवन येथे आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला असून, गटविकास अधिकारी नोडल अधिकारी म्हणून कार्य पाहणार आहेत. या कक्षात एक खिडकी पद्धतीने प्रचारासंबंधी सर्व परवानग्या दिल्या जाणार आहेत. तसेच FST, SST आणि VST पथकांद्वारे आचारसंहिता नियंत्रण ठेवण्यात येणार असल्याचे तहसीलदार सचिन लंगुटे यांनी स्पष्ट केले.

निवडणूक कार्यक्रम

निवडणूक कार्यक्रम जाहीर : १६ जानेवारी
नामनिर्देशन अर्ज भरणे : १६ ते २१ जानेवारी
छाननी व यादी प्रसिद्ध : २२ जानेवारी
उमेदवारी अर्ज माघार : २३ ते २७ जानेवारी
अंतिम यादी व चिन्ह वाटप : २७ जानेवारी
मतदान : ५ फेब्रुवारी | सकाळी ७.३० ते सायं. ५.३०
मतमोजणी : ७ फेब्रुवारी

Leave a Reply

Back To Top