पंढरपूर तालुक्यात निवडणूक छाननी पूर्ण:जिल्हा परिषदेचे 5 व पंचायत समितीचे 12 अर्ज नामंजूर
पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण झाली असून जिल्हा परिषदेचे 5 तर पंचायत समितीचे 12 अर्ज नामंजूर ठरले आहेत. 408 अर्ज वैध ठरले असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
Pandharpur election news:पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२ – पंढरपूर तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया गुरुवारी तहसील कार्यालय पंढरपूर येथे पूर्ण झाली.यामध्ये जिल्हा परिषदेचे 5 अर्ज तर पंचायत समितीचे 12 अर्ज नामंजूर ठरविण्यात आले आहेत, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन लंगुटे यांनी दिली.

पंढरपूर तालुक्यातील 8 जिल्हा परिषद गटांसाठी एकूण 158 अर्ज दाखल झाले होते.यापैकी 5 अर्ज नामंजूर झाल्याने आता 153 अर्ज वैध ठरले आहेत.तर 16 पंचायत समिती गणांसाठी 267 अर्ज दाखल झाले होते.त्यापैकी 255 अर्ज वैध ठरले असून 12 अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत.
जिल्हा परिषद गटनिहाय स्थिती
भाळवणी गट : 2 अर्ज नामंजूर, 13 वैध
टाकळी गट : 2 अर्ज नामंजूर, 25 वैध
कासेगाव गट : 1 अर्ज नामंजूर, 23 वैध
करकंब : 15 अर्ज वैध
भोसे : 13 अर्ज वैध
रोपळे : 19 अर्ज वैध
वाखरी : 26 अर्ज वैध
पंचायत समिती गणनिहाय नामंजूर अर्ज
सुस्ते गण : 4 अर्ज
वाखरी गण : 1 अर्ज
भाळवणी गण : 2 अर्ज
पळशी गण : 2 अर्ज
खर्डी गण : 2 अर्ज
कासेगाव गण : 1 अर्ज
उर्वरित सर्व पंचायत समिती गणांमधील अर्ज वैध ठरले आहेत. छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे आता निवडणूक रिंगणातील चित्र अधिक स्पष्ट झाले असून पुढील टप्प्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

