हुतात्मा दिनानिमित्त महाराष्ट्र सदनात हुतात्म्यांना भावपूर्ण अभिवादन
हुतात्मा दिनानिमित्त नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आयोजित कार्यक्रमात दोन मिनिटांचे मौन पाळून देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
New Delhi newsb: नवी दिल्ली,दि.30 : देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर हुतात्म्यांच्या स्मरणार्थ हुतात्मा दिन आदरभावाने पाळण्यात आला. या निमित्ताने नवी दिल्लीतील कॉपर्निकस मार्गावरील महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात आज आयोजित कार्यक्रमात उपस्थितांनी दोन मिनिटांचे मौन पाळून हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

या कार्यक्रमाला निवासी आयुक्त तथा सचिव आर.विमला, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल,सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार,जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे,सहायक लेखाधिकारी निलेश केदारे,व्यवस्थापक प्रमोद कोलपते, उपअभियंता किरण चौधरी यांच्यासह महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी स्वातंत्र्यलढ्यात देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या त्यागाचे स्मरण करून त्यांच्या कार्याला अभिवादन केले. हुतात्म्यांचे बलिदान देशाच्या इतिहासातील अमूल्य ठेवा असून त्यांच्या आदर्शांवर चालणे हीच खरी श्रद्धांजली असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

