मेहनत, सातत्य आणि गुणवत्तेचा आदर्श : विक्रम नाईकनवरे यांची पत्रकारितेत प्रथम श्रेणीत पदवी

पत्रकारितेच्या क्षेत्रात मराठी माध्यमातून यश : विक्रम नाईकनवरे यांना प्रथम श्रेणीत पदवी

मेहनत, सातत्य आणि गुणवत्तेचा आदर्श : विक्रम नाईकनवरे यांची पत्रकारितेत प्रथम श्रेणीत पदवी

पंढरपूर येथील पत्रकार विक्रम राजाराम नाईकनवरे यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून मराठी माध्यमात पत्रकारितेची पदवी प्रथम श्रेणीत संपादन करत माध्यम क्षेत्रातील मेहनत व गुणवत्तेचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे.

Pandharpur news:पंढरपूर / पुणे, ज्ञानप्रवाह न्यूज : पंढरपूर तालुक्यातील पत्रकार विक्रम राजाराम नाईकनवरे यांनी पत्रकारिता व माध्यमशास्त्र या क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत प्रथम श्रेणीत पदवी प्राप्त केली आहे.विशेष म्हणजे त्यांनी शिक्षणाचे माध्यम मराठी ठेवूनही पत्रकारिता क्षेत्रात शैक्षणिक यश मिळवून मेहनत,सातत्य आणि गुणवत्तेचे उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.ही पदवी त्यांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,नाशिक यांच्यावतीने प्रदान करण्यात आली.

विद्यापीठाच्या ३१ व्या दीक्षांत समारंभात राज्यभरातील सुमारे १ लाख २४ हजार विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.

या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. निर्मलजीत सिंह कलसी उपस्थित होते. तसेच विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनावणे यांच्यासह शिक्षण,प्रशासन व विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला हजेरी लावली.

मराठी माध्यमातून शिक्षण घेत असतानाही पत्रकारिता व माध्यम क्षेत्रात गुणवत्ता सिद्ध करता येते हे विक्रम नाईकनवरे यांच्या यशातून स्पष्ट होते. त्यांच्या या यशाबद्दल मित्रपरिवार, सहकारी पत्रकार, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच नातेवाईकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Back To Top