सह्याद्रीवरील सखी सह्याद्री मध्ये उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे:दाही दिशा पुस्तकावर सखोल वैचारिक चर्चा

सह्याद्रीवरील सखी सह्याद्री मध्ये उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे; दाही दिशा पुस्तकावर सखोल वैचारिक चर्चा

सखी सह्याद्री मध्ये डॉ.नीलम गोऱ्हेंचा लेखिकेच्या भूमिकेत विशेष सहभाग

सह्याद्री वृत्तवाहिनीवरील सखी सह्याद्री कार्यक्रमात विधानपरिषदेचे उपसभापती व ज्येष्ठ लेखिका डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दाही दिशा पुस्तकाच्या निमित्ताने सामाजिक व वैचारिक विषयांवर सखोल चर्चा केली.

Pune news : पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज, ०५/०२/२०२५: –सह्याद्री वृत्तवाहिनीवरील वैचारिक कार्यक्रम सखी सह्याद्री मध्ये विधान परिषदेच्या उपसभापती तसेच ज्येष्ठ लेखिका डॉ. नीलम गोऱ्हे यांचा विशेष सहभाग झाला. या कार्यक्रमात त्यांच्या साहित्यिक प्रवासासह नव्याने प्रकाशित झालेल्या ‘दाही दिशा’ या पुस्तकाच्या निमित्ताने विविध सामाजिक व वैचारिक विषयांवर चर्चा करण्यात आली.

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आजवर ३० हून अधिक पुस्तके लिहिली असून त्यांच्या लेखनात सामाजिक वास्तव, स्त्रीमन, विचारप्रवाह आणि जीवनमूल्यांचा ठसा आढळतो. ‘दाही दिशा’ या पुस्तकातून समाज, परिवर्तन आणि व्यक्तीच्या अंतर्मुख प्रवासावर प्रकाश टाकण्यात आला आहे. पुस्तक हे समाजाशी संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम आहे. मी राजकारणात असले तरी त्यासोबतच मी एक लेखिका आहे,असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात स्त्री सक्षमीकरण,सामाजिक जबाबदारी, राजकारणातील महिलांची भूमिका,विचारस्वातंत्र्य आणि मूल्यव्यवस्था या विषयांवर मुक्त संवाद झाला. महिलांनी निर्भीडपणे आपले विचार मांडावेत व समाजपरिवर्तनात सक्रिय भूमिका घ्यावी, असा संदेश त्यांनी दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उन्नती जगदाळे यांनी केले. तंत्रनिर्देशन आरती अभ्यंकर, निर्मिती नीलम भोसले, तर कार्यकारी निर्माता राजेश दळवी होते.

Leave a Reply

Back To Top