मंगळवेढा पंढरपूर रस्त्यावर भीषण अपघात; एसटी बसच्या धडकेत पिकअप चालक ठार, एक जखमी

मंगळवेढा–पंढरपूर रस्त्यावर भीषण अपघात; एसटी बसच्या धडकेत पिकअप चालक ठार, एक जखमी

मंगळवेढा येथील खवतोडे पेट्रोलपंपाजवळ एसटी बस व पिकअपचा भीषण अपघात.बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे पिकअप चालकाचा मृत्यू,एक जण गंभीर जखमी.मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

Mangalwedha accident news: मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११ : मंगळवेढा–पंढरपूर मार्गावर खवतोडे पेट्रोलपंपासमोर आज सकाळी भीषण अपघात घडून पिकअप चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 90/2026 नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादी अरुणकुमार सुरेश पाटील वय २५,रा.सातलगाव, ता.चडचण,जि.विजापूर हे पिकअप क्रमांक MH12SX7328 मधून मंगळवेढा ते पंढरपूरकडे जात असताना आज सकाळी सुमारे ७.१५ वाजता खवतोडे पेट्रोलपंपा समोर समोरून येणाऱ्या एसटी बस क्रमांक MH14BT4427 ने जोरदार धडक दिली.

पिकअप वाहन चालवत असलेले अविनाथ बिराप्पा पुजारी वय २४,रा. लोणीकंद,ता.हवेली जि.पुणे यांना अपघातात गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला.फिर्यादी अरुणकुमार पाटील यांच्या उजव्या खांद्याला फ्रॅक्चर होऊन तोंड व नाकाला गंभीर जखमा झाल्या असून त्यांच्यावर श्री साई समर्थ हॉस्पिटल मंगळवेढा येथे उपचार सुरू आहेत.

प्राथमिक तपासानुसार एसटी बस चालक अशोक पाटील रा.निंबोणी,ता.मंगळवेढा याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे ओव्हरटेक करत समोरून येणाऱ्या पिकअपला धडक दिल्याचे निष्पन्न झाले आहे.या अपघातात बस चालकासही उजव्या कानाला दुखापत झाली असून दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या प्रकरणी बस चालकाविरुद्ध BNS कलम 281, 106(1), 125(a), 125(b), 324(5) तसेच मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 184 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोहेकॉ/ 1739 व्हरे करत आहेत.

Leave a Reply

Back To Top