बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा निवडणूक २०२६ : महिला राखीव प्रवर्गातून ॲड.धनश्री किरण घाडगे यांची उमेदवारी जाहीर
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा निवडणूक २०२६ साठी महिला राखीव प्रवर्गातून पंढरपूरच्या ॲड. धनश्री किरण घाडगे यांनी उमेदवारी जाहीर केली. महिला व नवोदित वकिलांचे सशक्तीकरण,डिजिटल न्यायप्रक्रिया आणि वकील कल्याण योजनांना प्राधान्य देण्याचा निर्धार.

Bar Council of Maharashtra and Goa Election 2026 : सोलापूर | ज्ञानप्रवाह न्यूज : बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर महिला राखीव प्रवर्गातून पंढरपूर येथील ज्येष्ठ वकील ॲड. धनश्री किरण घाडगे यांनी आपली उमेदवारी अधिकृतपणे जाहीर केली आहे.

उमेदवारी जाहीर करताना ॲड.धनश्री किरण घाडगे यांनी सांगितले की, राज्यभरातील विविध वकील संघटनांना दिलेल्या भेटी, वकिलांशी झालेला सखोल विचारविनिमय तसेच मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद,पाठिंबा व आशीर्वाद यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
न्यायालयीन प्रक्रियेत सुरू असलेले डिजिटल बदल, ई-फायलिंग व ऑनलाईन प्रणालीमुळे वकिलांना भेडसावणाऱ्या अडचणी,नवोदित वकिलांचे व्यावसायिक प्रश्न,महिला वकिलांचे सशक्तीकरण तसेच वकील कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी हे आपल्या कार्याचे प्रमुख प्राधान्यक्रम असतील,असे त्यांनी स्पष्ट केले.

एक महिला वकील म्हणून वकील वर्गाच्या अडचणी समजून घेऊन त्या बार कौन्सिलच्या व्यासपीठावर ठोसपणे मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहील. पारदर्शक,उत्तरदायी व संवादप्रधान प्रतिनिधित्व देण्याची भूमिका असल्याचेही त्यांनी नमूद केले.

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये वकिलांशी थेट संवाद साधण्यासाठी लवकरच राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती ॲड. धनश्री किरण घाडगे यांनी दिली.






