महिलांपर्यंत योजना पोहोचवा, संघटन बळकट करा–डॉ.नीलम गोऱ्हे यांचा स्पष्ट संदेश

महिलांपर्यंत योजना पोहोचवा, संघटन बळकट करा – डॉ. नीलम गोऱ्हे यांचा स्पष्ट संदेश

शिवसेना महिला आघाडीला नवी दिशा! कार्यशाळेत जनसेवा अधिक प्रभावी करण्याचे मार्गदर्शन

Mumbai shivsena news :मुंबई,दि.२७ एप्रिल २०२६ : शिवसेना महिला आघाडीच्या माध्यमातून तळागाळातील महिलांपर्यंत शासकीय योजना प्रभावीपणे पोहोचवण्याचे आवाहन महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती Dr. Neelam Gorhe यांनी केले. मुंबईत आयोजित महिला नगरसेविका व पदाधिकाऱ्यांसाठीच्या विशेष मार्गदर्शन कार्यशाळेत त्या बोलत होत्या.

या कार्यशाळेत महिला सक्षमीकरण, जनसेवा आणि संघटन बळकटीकरण यावर विशेष भर देण्यात आला. ‘धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता कक्ष’ आणि ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी’ यांसारख्या योजनांची माहिती प्रत्येक गरजू नागरिकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, महिलांनी केवळ राजकारणात सक्रिय न राहता समाजातील अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा. संघटितपणे काम केल्यास जनतेच्या प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे उपाययोजना करता येतात.
कार्यशाळेत विविध योजनांच्या अंमलबजावणीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. विशेषतः ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी’ अंतर्गत अर्ज प्रक्रिया, कॅशलेस उपचार, तसेच महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजना याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. मुंबईतील गरीब रुग्णांसाठी उपलब्ध उपचार सुविधांवरही प्रकाश टाकण्यात आला.

तसेच मतदार यादीच्या अचूकतेसाठी एस.आय.आर. (Special Intensive Revision) प्रक्रियेचे महत्त्व समजावण्यात आले. BLO मार्फत पडताळणी करून मतदार यादी त्रुटीमुक्त ठेवण्याचे उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

या कार्यशाळेत विविध महिला पदाधिकारी, नगरसेविका आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमामुळे महिला आघाडीच्या कामाला नवी दिशा मिळाली असून, जनसेवा अधिक प्रभावी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Back To Top