प्रत्यक्ष कॅनलवर जाऊन पाहणी करून चुका दुरुस्त करण्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आश्वासन

प्रत्यक्ष कॅनलवर जाऊन पाहणी करून चुका दुरुस्त करण्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर याचे आश्वासन District Collector Milind Shambharkar’s assurance to go to the canal and inspect and correct the mistakes
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर
   पंढरपूर / प्रतिनिधी - सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात उजनी उजवा व डावा कालव्याच्या भूसंपादन मोबदल्याप्रश्‍नी महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, उजनीचे अधिक्षक अभियंता जयंत शिंदे, पुनर्वसन चे उपसंचालक नागेश पाटील,भूसंपादन (समन्वय) च्या उपजिल्हाधिकारी अरुणा गायकवाड, उजनी पाठबंधारे विभाग मंगळवेढा क्र.8, 9 चे अधिकारी तसेच जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर भैय्या देशमुख, उजनी बचाव संघर्ष समितीचे प्रणेते समाधान गाजरे यांच्यासह कालवाबाधित शेतकरी उपस्थित होते.

  शेकडो शेतकर्‍यांची प्रचंड उपस्थिती पाहता कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या विनंतीला मान देऊन बैठकीसाठी उजनी संघर्ष समितिच्या शिष्टमंडळासोबत जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या दालनात बैठक संपन्न झाली. 

  कालवाबाधित शेतकर्‍यांच्यावतीने बोलताना संघर्ष समितीचे समाधान गाजरे सर यांनी 25 जानेवारी 2017 च्या शासन निर्णयानुसार जलसिंचनासाठी व इतर सिंचन पद्धतीसाठी खाजगी जमीन थेट खरेदीने व खाजगी वाटाघाटीने संपादित करणेबाबतचा जो जी.आर. होता त्या नुसार केलेल्या अवार्ड ची कार्यवाही झाली नसून शासन निर्णयाच्या अगदी विरोधात शेतकर्‍यांना फसवून आणि गाफील ठेऊन अवॉर्ड केल्याचे स्पष्ट केले, जी.आर.मधील तरतुदी आणि प्रत्यक्ष कार्यवाही यामध्ये खूप मोठी तफावत असल्याचे पुराव्यासह सादर केले.शासन निर्णयानुसार भू संपादन अवार्ड करणेसाठी शेतकर्‍यांना नोटीस देणे, वर्तमानपत्र जाहिरातबाजी करणे,गाव चावडी मध्ये माहिती प्रसारीत करून,दवंडी देने, सर्व व्यवहाराची माहिती देणे,व्यवहार पारदर्शक करणे, प्रत्यक्ष संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी करणे, शेतकर्‍यांची संमती घेणे यापैकी शेतकर्‍यांच्या जमिनीचा अवार्ड करताना शासन निर्णयामधील कोणत्याही गोष्टीचे अथवा मार्गदर्शक तत्वाचे पालन पाटबंधारे अधिकारी,विभाग आणि मूल्यांकन समितीने केले नसल्याचे समाधान गाजरे सर यांनी पुराव्यासह पटवून दिले.यावर स्पष्टीकरण देण्यासाठी एकही पाटबंधारे अधिकारी पुढं येऊ शकला नाही.

 सुमारे 2 ते अडीच तास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी उपस्थित सर्व शेतकर्‍यांचे म्हणणे ऐकून घेतले. पुराव्यानिशी कालवाबाधीत शेतकर्‍यांनी सर्व मुद्दे मांडल्यामुळे जिल्हाधिकारी काही काळ आवक झाल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे त्यांनी पंढरपूर येथे येऊन प्रत्यक्ष कॅनल वर जाऊन पाहणी करून, चुका दुरुस्त करण्याचे आश्‍वासन दिले व लवकरच जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पालकमंत्री भरणे,मुख्य सिंचन आयुक्त यांच्यासह शेतकर्‍यांच्या बैठकीचे आश्‍वासन ही दिले.त्याचबरोबर चालू अवॉर्डमध्ये ज्या ठळक चुका झाल्या आहेत त्या तात्काळ दुरुस्त करून अशी प्रकरणे निकालात काढण्याचे आदेश ही शंभरकर यांनी पाटबंधारे विभागाला दिले.

  कालवाबाधित शेतकर्‍यांच्यावतीने जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर भैय्या देशमुख,पत्रकार प्रविण नागणे,जनाबाई शेळके,श्रीकांत नलवडे, रणदिवे सर,अमोल रणदिवे यांनी बाजू मांडली.

 उजनीचे अधिक्षक अभियंता जयंत शिंदे यांनी नंतर शेतकर्‍यांची स्वतंत्र भेट घेऊन त्यांच्या सर्व भावना जाणून घेतल्या.जिल्ह्यातून आलेल्या जवळपास चारशे ते पाचशे कालवाबाधित शेतकर्‍यांच्या घोषणेने जिल्हाधिकारी कार्यालय व परिसर दुमदुमून निघाला.याप्रसंगी अमोल रणदिवे, श्रीकांत नलवडे,रायप्पा हलणवर,विजय रणदिवे, आगतराव रणदिवे,सीताराम रणदिवे,विलास चव्हाण,वैभव डोळे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात आ.रोहित पवार पॅटर्न राबवा

कुकडी प्रकल्प बाधीतांना आ. रोहित पवार यांनी 25 पट मोबदला मिळवून दिला मग आम्हाला असा मोबदला का मिळत नाही ? आम्ही काय पाकिस्तानात राहतो का. आम्हाला व्याजासहित रक्कम द्या यासाठी आम्ही दोन महिन्यांची मुदत दिली असून दोन महिन्यात शेतकर्‍यांना योग्य न्याय न मिळाल्यास आम्ही रस्त्यावर येऊन मोठा संघर्ष उभा करू – प्रभाकर भैया देशमुख, संस्थापक अध्यक्ष जनहित शेतकरी संघटना

प्रभाकर भैया देशमुख, संस्थापक अध्यक्ष जनहित शेतकरी संघटना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: