महिला अत्याचार प्रश्नावर महाराष्ट्र विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेण्याची राज्यपालांची सूचना योग्य – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले

महिला अत्याचार प्रश्नावर महाराष्ट्र विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेण्याची राज्यपालांची सूचना योग्य – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले Governor’s instruction to hold special session of Maharashtra Legislature on women’s atrocities is correct – Union Minister of State Ramdas Athawale
 मुंबई, दि.22/09/2021 - महाराष्ट्रात महिला अत्याचार प्रकरणांमध्ये चिंताजनक वाढ झाली असल्याच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन आयोजित करून महिला अत्याचार रोखण्याबाबत चर्चा करण्याची राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सूचना केली आहे. ही सूचना अत्यंत योग्य असून राज्यातील जनतेच्या मनातील मागणी राज्यपालांनी पत्र लिहून मुखमंत्र्यांना सूचित केली आहे . या मागणीला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा असून राज्य सरकारने त्वरित महिला अत्याचार प्रश्नावर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलाविले पाहिजे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. 

मुंबईत नुकताच साकिनाका येथे एका महिलेवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्याचा अमानुष प्रकार घडला होता. त्या पार्श्वभूमीवर महिला अत्याचार प्रश्नावर  विधिमंडळाचे विशेष बोलविण्याची राज्यपालांची सूचना अत्यंत योग्य आहे.त्यावर मुख्यमंत्र्यांनी भाजपशासित राज्यांनी  अधिवेशन बोलवावे अशी मागणी केली आहे. महाराष्ट्राचे अधिवेशन घेण्याबाबतचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असल्याने महिला अत्याचार रोखण्याबाबतच्या संवेदनशील विषयावर मुख्यमंत्र्यांनी तत्परता दाखवावी.महिला अधिकारा बाबत फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र  नेहमीच अग्रेसर राहिला आहे.तो परंपरा जोपासत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिलांवरील  अत्याचार रोखण्याबाबत विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी आज मुंबईत केले आहे.

एकंदरीत संपूर्ण देशभरातच महिला आणि अल्पवयीन मुलींवर अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुढाकार घेऊन केंद्र शासनामार्फत हैद्राबाद पँटर्न राबविण्यासाठी तातडीने पावले उचलली गेली तरच या गुन्हेगारांवर जरब बसवली जाणार आहे. नाहीतर केसेस वर्षानुवर्षे चालतात आणि आरोपी अपिलावर अपील करत असतात. बलात्कारी पिसाळले आहेत त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आता फक्त हैद्राबाद पँटर्न आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: