उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली असता त्यांनी सकारात्मक भुमिका दर्शविली असून लवकरच विद्युत पुरवठा सुरळीत होईल – मा.आ.प्रशांत परिचारक

पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात अपुर्या पावसामुळे आणि कडक उन्हाळ्यामुळे पाण्याची पाणी टंचाई

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – अपुर्या पावसामुळे आणि कडक उन्हाळ्यामुळे पाण्याची पाणी टंचाई निर्माण झाली आहे.ग्रामीण भागातील शेतकरी आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहेत.उजनी धरणातून पाणी सोडले असले तरी नदीकाठच्या गावांचा वीज पुरवठा फक्त दोन तास केल्यामुळे पाणी टंचाई मोठ्या प्रमाणावर भासत आहे त्यासाठी विधानपरिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना भेटून पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील भीमा नदीकाठचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्याबाबत मागणी केली.

भीमा नदीमध्ये सध्या पिण्याच्या पाण्यासाठी उजनी धरणातून पाणी सोडले आहे. मात्र नदीकाठचा विद्युत पुरवठा फक्त दोन तास केल्यामुळे त्या दोन तासांमध्ये नदीकाठच्या शेतकऱ्यांना पुरेसे पाणी मिळत नाही.त्यामुळे पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील नदीकाठचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली असता त्यांनी सकारात्मक भुमिका दर्शविली असून लवकरच विद्युत पुरवठा सुरळीत होईल आणि पाणी टंचाई काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल अशी माहिती माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *