अखेरच्या चेंडूवर पराभव; चॅम्पियन कर्णधाराचा संघ प्लेऑफ शर्यतीतून बाहेर


दुबई: न्यूझीलंडला आयसीसीच्या पहिल्या टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेतेपद मिळून देणारा कर्णधार केन विलियमसनला आयपीएलच्या १४व्या हंगामात मोठा धक्का बसला. काल शनिवारी पंजाब किंग्ज विरुद्ध झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पाच धावांनी पराभव झाला. या पराभवासह आयपीएलच्या १४व्या हंगामातील त्याचे आव्हान संपुष्टात आले.

वाचा- RCB vs MI Preview: पराभवाची हॅट्रिक रोखण्यासाठी रोहित शर्मा घेणार मोठा निर्णय

पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करत हैदराबादला १२६ धावांचे आव्हान दिले होते. हैदराबादची सुरुवात खराब झाली होती. पण जेसन होल्डरने अखेरच्या षटकापर्यंत चांगली लढत दिली. विजयासाठी ६ चेंडूत १७ धावांची गरज होती. तर अखेरच्या चेंडूवर ६ धावा हव्या होत्या. पण होल्डरला षटकार मारण्यात अपयश आले. या पराभवामुळे हैदराबाद आयपीएल २०२१ मध्ये प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेला पहिला संघ ठरला.

वाचा- ‘माझी बायको मला CSKची जर्सी घालू देत नाही’; RCBच्या फॅनची तक्रार

आयपीएलच्या पहिल्या सत्रात खराब कामगिरीमुळे स्पर्धेच्या मध्येच डेव्हिड वॉर्नरकडून विलियमसनकडे नेतृत्व देण्यात आले होते. कर्णधार बदलला तरी त्यांची कामगिरी खराबच झाली. हैदराबादला ९ पैकी फक्त एका लढतीत विजय मिळवता आलाय. गुणतक्त्यात ते अखेरच्या स्थानावर आहेत. आता पुढील पाच सामन्यात विजय मिळवला तरी ते प्लेऑफ म्हणजे अव्वल चार मध्ये पोहोचू शकणार नाहीत.

वाचा- Video : झुलन गोस्वामीने रचला इतिहास; असा पराक्रम करणारी ती जगातील पहिली गोलंदाजSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: