बलुच बंडखोरांनी जिन्नांचा पुतळा बॉम्बने उडवला; जून महिन्यात झाले होते लोकार्पण


ग्वादर: बलुचिस्तान प्रांतात बलुच बंडखोरांच्या हिंसक कारवाया सुरूच आहेत. बलुच दहशतवाद्यांनी पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांचा पुतळा बॉम्बद्वारे उद्धवस्त केला. सुरक्षित समजल्या जाणाऱ्या मरिन ड्राइव्हवर हा पुतळा जून महिन्यात बसवण्यात आला होता. रविवारी या पुतळ्याच्या खाली स्फोटके ठेवून पुतळा उद्धवस्त करण्यात आला.

‘ द डॉन’ने दिलेल्या वृत्तानुसार, या स्फोटात संपूर्ण पुतळा उद्धवस्त झाला. या स्फोटाची जबाबदारी बंदी असलेल्या बलोच रिपब्लिकन आर्मी या संघटनेने घेतली असल्याचे वृत्त बीबीसी उर्दूने दिले आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे.

पाकिस्तानचे कौतुक तर काश्मीरबाबत तालिबानने केले ‘हे’ वक्तव्य
ग्वादरचे उपायुक्त अब्दुल कबीर यांनी सांगितले की, स्फोटके लावून पुतळा उद्धवस्त करणारे दहशतवादी पर्यटक म्हणून या भागात दाखल झाले. या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नाही. येत्या एक-दोन दिवसांमध्ये या प्रकरणाचा तपास पूर्ण केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला जात असून लवकरच दोषींना अटक करण्यात येईल असेही त्यांनी म्हटले.

पाकिस्तान: मशिदीतून पाणी घेतल्याने हिंदू कुटुंबाचा छळ
मागील काही महिन्यात बलुच बंडखोरांच्या हिंसक कारवाया वाढल्या आहेत. क्षेत्रफळाच्या दृष्टीने बलुचिस्तान हा पाकिस्तानमधील मोठा प्रांत आहे. तर, बलुच नागरिकांचे पाकिस्तानच्या लोकसंख्येतील प्रमाण ९ टक्के आहे. बलुच बंडखोरांकडून बलुच प्रांतात सुरू असलेल्या चिनी प्रकल्पांना विरोध केला जात आहे. चिनी अधिकारी, अभियंते, कर्मचाऱ्यांवरही हल्ले करण्यात आले आहेत. चिनी प्रकल्प हे बलुच नागरिकांच्या जमिनी हडपण्याचा डाव असल्याचा बंडखोरांनी केला होता.Source link

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: