VIDEO: आंदोलनात घुसू पाहणाऱ्या काँग्रेस नेत्याला शेतकऱ्यांनी दाखवला घरचा रस्ता


हायलाइट्स:

  • ‘शेतकऱ्यांचं आंदोलन ही राजकीय आंदोलन नाही’
  • काँग्रेस नेते अनिल चौधरी यांनी शेतकऱ्यांनी आंदोलन स्थळावरून हटकलं
  • कोणताही राजकीय अजेंडा नसल्याचं चौधरींचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली : केंद्रानं लागू केलेल्या कृषी कायद्यांचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचा गेल्या १० महिन्यांपासून आपल्या मागण्यांसाठी लढा सुरू आहे. या आंदोलकांकडून आज ‘भारत बंद’चं आवाहन करण्यात आलंय. या आंदोलनात घुसून आपला हेतू साध्य करू पाहणाऱ्या राजकीय नेत्यांपासून शेतकरी आंदोलकांनी दूर राहण्याचा प्रयत्न करत आहेत. असाच एक प्रकार आज भारत बंद आंदोलना दरम्यान गाझीपूर सीमेवर पाहायला मिळाला.

‘संयुक्त किसान मोर्चा’च्या नेतृत्वाखाली पुकारण्यात आलेल्या या भारत बंदला आणि आंदोलक शेतकऱ्यांना काँग्रेस, शिवसेना, वायएसआर-काँग्रेस, आप यांसहीत अनेक राजकीय पक्षांनी आपला पाठिंबा व्यक्त केलाय.

याच दरम्यान, दिल्ली प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अनिल चौधरी शेतकरी आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी थेट गाझीपूर सीमेवर पोहचले. परंतु, आंदोलकांनी मात्र ‘हे राजकीय आंदोलन नसल्याचं’ सांगत चौधरी यांना घरचा रस्ता दाखवला.

‘भारत बंद’ला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही राजकीय नेत्यांचे आभार मानतो परंतु, आमच्या प्रश्नांचा आणि मंचाचा राजकारणाशी संबंध नाही. आम्ही राजकीय पक्षांना आमच्या मंचावर परवानगी देणार नसल्याचं आम्ही अगोदरच जाहीर केलं होतं. त्यामुळे आम्ही त्यांना शेतकरी आंदोलन स्थळापासून थोड्या अंतरावर आपलं आंदोलन करण्याची विनंती केली’, असं भारतीय किसान युनियनचे नेते प्रविण मलिक यांनी म्हटलंय.

यावर, ‘मी शेतकरी आंदोलकांची परिस्थिती समजू शकतो. हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. शेतकऱ्यांना वाटत असेल की आम्ही इथून निघून जावं, तर आम्ही परत जाऊ. आम्ही इथं फक्त शेतकऱ्यांसाठी आलो होतो, यामागे कोणताही राजकीय अजेंडा नव्हता’, असं स्पष्टीकरण अनिल चौधरी यांनी दिलंय.

Bharat Bandh: मनापासून शेतकऱ्यांसोबत, संजय राऊत यांनी व्यक्त केला शेतकऱ्यांना पाठिंबा
Farmers Protest: ‘भारत बंद’ दरम्यान सिंघु सीमेवर शेतकऱ्याचा मृत्यू
LIVE: ‘भारत बंद’च्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सीमेवर तणाव, सुरक्षेत वाढ

दरम्यान, दिल्लीच्या सीमा, नोएडा, हरयाणा, अंबाला, फिरोजपूर या भागांत शेतकरी आंदोलनाचा परिणाम दिसून येतोय. आंदोलकांनी अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर ठाण मांडल्यानं रेल्वे सेवाही विस्कळीत झालीय. केवळ अंबाला – फिरोजपूर भागातील २५ रेल्वेंना याचा फटका बसल्याची माहिती उत्तर रेल्वेकडून देण्यात आलीय.


हरयाणा, पंजाब, यूपी, कर्नाटक, केरळमध्येही पडसाद

राजधानी दिल्लीशिवाय हरयाणा, पंजाब, बिहार, पश्चिम बंगालमध्येही या आंदोलनाचा व्यापक परिणाम दिसून येतोय. कर्नाटकमध्येही वेगवेगळ्या संघटनांनी कलबुर्गही सेंट्रल बस स्टेशनच्या बाहेर आंदोलन केलं.
तसंच केरळच्या अनेक भागांतही भारत बंदचे परिणाम दिसून येत आहे. तिरुअनंतपुरममध्ये दुकानंही बंद ठेवण्यात आली आहेत. रस्ते मोकळे दिसून येत आहे. एलडीएफ आणि यूडीएफशी निगडीत ट्रेड युनियनकडून तीन कृषी कायद्यांविरोधात भारत बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. उत्तर प्रदेशातही भारत बंदच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, संयुक्त किसान मोर्चानं पुकारलेल्या भारत बंदला देशभरातून मिळालेल्या पाठिंब्यासाठी राकेश टिकैत यांनी आभार मानलेत. या आंदोलनामुळे नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागत असल्यानं टिकैत यांनी नागरिकांकडे क्षमा याचनाही केलीय.

देशांत महामार्गांच्या निर्माणाचा धडाका, कुठे वनांची कत्तल तर कुठे टोलच्या दरांत वाढ
Cyclone Gulab: ‘गुलाब’ चक्रीवादळात आंध्राचे काही मच्छिमार बेपत्ता, शोध सुरूSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: