प्राप्तिकर विभागाचे छापे; राज्यातील स्टील उद्योगावर कारवाई, ३०० कोटींची बेहिशेबी मालमत्ता


हायलाइट्स:

  • जालना स्थित चार मोठ्या स्टील रोलिंग कारखान्यांच्या एका समूहाशी संबंधित विविध स्थळांवर छापे
  • हिशेब नसलेला बराच मोठा मालही कारखाना परिसरात सापडला आहे.
  • छापेमारी दरम्यान १२ बँक लॉकर्स उघडकीस आणले गेले.

मुंबई : बेहिशेबी मालमत्ता आणि कर चुकवेगिरीबाबात प्राप्तिकर विभागाने पुन्हा एकदा राज्यातील एका बड्या उद्योग समूहावर छापे टाकले . २३ सप्टेंबर २०२१ रोजी प्राप्तिकर विभागाने महाराष्ट्रातील जालना स्थित चार मोठ्या स्टील रोलिंग कारखान्यांच्या एका समूहाशी संबंधित विविध स्थळांवर छापे आणि जप्तीची कारवाई केली. या सर्व कंपन्या स्टीलचे टीएमटी बार्स आणि बिलेट्स म्हणजेच छर्रे बनवण्याच्या उद्योगात आहेत. जालना, औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि कोलकाता या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली.

तेजी कायम ; शेअर बाजारात सेन्सेक्स – निफ्टीची घोडदौड सुरूच
या कारवाई दरम्यान, अधिकाऱ्यांना गैरव्यवहारांना दुजोरा देऊ शकतील असे पुरावे असलेले असलेली अनेक कागदपत्रे, सुटे कागद आणि इतर डिजिटल पुरावे सापडले असून हे सर्व पुरावे जप्त करण्यात आले आहेत. या कागदपत्रांवरुन या कंपन्या खूप मोठ्या बेहिशेबी आर्थिक व्यवहारात गुंतल्या असल्याचे स्पष्ट होत आहे. यातील अनेक व्यवहारांची कुठल्याही अधिकृत कागदपत्रांवर नोंद नाही.

दरवाढीचा दणका ; चार दिवसांत तिसऱ्यांदा डिझेल महागले, हा आहे आजचा दर
या ठिकाणी आढळलेल्या इतर पुराव्यांनुसार, या कंपन्यांनी बनावट कंपन्या आणि शेयर प्रीमियमच्या माध्यमातून केलेला बऱ्याच मोठ्या बेहिशेबी रकमेचा गैरव्यवहार देखील समोर आला आहे. सुमारे २०० कोटी रुपयांची अतिरिक्त खरेदी लक्षात आली असून, हिशेब नसलेला बराच मोठा मालही कारखाना परिसरात सापडला आहे.

आरोग्यसेवा क्षेत्राला पत पुरवठा; कोटक महिंद्रा बॅंक देणार आरोग्यविषयक गरजांसाठी कर्ज
छापेमारी दरम्यान १२ बँक लॉकर्स उघडकीस आणले गेले. त्याशिवाय २.१० कोटी रुपयांची बेहिशेबी रोख रक्कम, १.०७ कोटी रुपयांचे दागिने देखील जप्त करण्यात आले आहेत. आतापर्यंत मिळालेल्या पुराव्यांनुसार ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याची बेहिशेबी मालमत्ता समोर आली असून चार कंपन्यांचे ७१ कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न असल्याचेही तपासात आढळले आहे. या प्रकरणी पुढचा तपास सुरु आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: