a girl died in a lightning strike: जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस; वीज पडून महिलेसह बालिकेचा मृत्यू


हायलाइट्स:

  • जळगाव जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एका महिलेसह १३ वर्षीय मुलीचा मृत्यू.
  • आज जिल्ह्यात बहुसंख्य भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी दिली.
  • या घटनांमुळे परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

जळगाव जिल्ह्यात आज सोमवारी वीज पडून दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एका महिलेसह १३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. आज जिल्ह्यात बहुसंख्य भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी दिली. त्या दरम्यान या घटना घडल्यात. (a girl died in a lightning strike in jalgaon district)

रावेर तालुक्यातील विवरा खुर्द येथील माजी सरपंच कविता राजेंद्र पाटील यांच्या शेतात वाघेला हे आदिवासी शेतमजूर कुटुंब झोपडीतच रहात होते. दुपारी चारला पावसाला सुरुवात झाली. त्यावेळी नूरकी वाघेला (वय३५) ही महिला शेजारच्याच विहिरीवर गेली असता तिच्या अंगावर वीज कोसळून ती जागीच ठार झाली शेजारीच असलेल्या झोपडीत तिची भाची रोशनी (वय९), मुलगा राहुल (वय७) आणि मुलगी रवीना (वय३) यांना सुदैवाने कोणतीही इजा झाली नाही.

क्लिक करा आणि वाचा- पुढील २ तासांत या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता

याच शेतात दुसऱ्या बाजूला काम करणारा तिचा पती देखील सुदैवाने बचावला आहे. वीज पडलेला महिलेला तातडीने रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र तत्पूर्वीच तिचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

क्लिक करा आणि वाचा- करोनाचा संसर्ग येतोय आटोक्यात; पाहा, संपूर्ण राज्यातील ताजी स्थिती!

विटनेर येथे बालिकेचा मृत्यू

जळगाव तालुक्यातील विटनेर शिवारात शेतात राहणाऱ्या १३ वर्षीय मुलीच्या अंगावर वीज कोसळल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना आज सायंकाळी घडली. सोनाली राजेंद्र बारेला (वय-१३) रा. विटनेर ता. जि.जळगाव असे मयत मुलीचे नाव आहे. विटनेर शिवारातील शेतात सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास शेतात असतांना तिच्या अंगावर कोसळली त्यात तीचा जागीच मृत्यू झाला आहे. जळगाव येथील एस.यु.पाटील यांच्या शेतात राहणारा रविंद्र भिमसिंग बारेला यांच्याकडे साधारण एक ते दीड महिन्यापासून सोनाली राजेंद्र बारेला राहत होती. त्याच्या मृत्यूने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.

क्लिक करा आणि वाचा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पंतप्रधान मोदींना पत्र; केली महत्वाची मागणी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: