coronavirus latest updates: करोनाचा संसर्ग येतोय आटोक्यात; पाहा, संपूर्ण राज्यातील ताजी स्थिती!
हायलाइट्स:
- गेल्या २४ तासांत राज्यात २ हजार ४३२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
- गेल्या २४ तासांमध्ये एकूण २ हजार ८९५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
- आज राज्यात एकूण ३२ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आज राज्यात झालेल्या ३२ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवरच स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख ६२ हजार २४८ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२६ टक्के इतके झाले आहे.
क्लिक करा आणि वाचा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पंतप्रधान मोदींना पत्र; केली महत्वाची मागणी
राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या घटली
आज राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३७ हजार ०३६ इतकी आहे. काल ही संख्या ३७ हजार ८६० इतकी होती. या बरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा ९ हजार २४३ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात ही संख्या ५ हजार ८८८ आहे. अहमदनगरमध्ये ही संख्या ५ हजार ५०६ अशी वाढली आहे. त्या खालोखाल साताऱ्यात ही संख्या २ हजार २०१ वर आहे. तर, सांगलीत एकूण १ हजार ३५७ आहे. तसेच, सोलापुरात ही संख्या १ हजार ६९९ इतकी आहे.
क्लिक करा आणि वाचा- सरकारच्या धोरणाविरोधात रोष; कोल्हापुरातील रंगकर्मींनी केले पितृस्मृती आंदोलन
मुंबईत उपचार घेत आहेत ५,०५३ रुग्ण
मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांच्या संख्या ५ हजार ०५३ इतकी आहे. तर, रत्नागिरीत ६७४ इतकी आहे आहे, सिंधुदुर्गात ७२२, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ८८६ इतकी खाली आली आहे.
धुळे जिल्ह्यात एक सक्रिय रुग्ण
या बरोबरच, औरंगाबादमध्ये २९३, नागपूर जिल्ह्यात ही संख्या ११५ इतकी वाढली आहे. अमरावतीत ही संख्या १०० वर आली आहे. तर धुळे आणि भंडाऱ्यात सर्वात कमी, प्रत्येकी २ सक्रिय रुग्ण आहेत.
क्लिक करा आणि वाचा- अण्णांच्या मदतीला आता माजी सैनिकांची फौज; जन आंदोलन होणार तीव्र
२,५७,१४४ व्यक्ती होम क्वारंटाइन
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ८२ लाख ८६ हजार ०३६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५ लाख ४१ हजार ७६२ (११.२२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ५७ हजार १४४ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, १ हजार ५१७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.