हिवताप, हत्तीरोग व मतदार जनजागृतीसाठी अक्कलकोट येथे रॅलीचे आयोजन

हिवताप व हत्तीरोग जनजागृती व मतदार जनजागृतीसाठी अक्कलकोट येथे रॅलीचे आयोजन

जागतिक हिवताप दिनाच्या अनुषंगाने हत्तीरोग नियंत्रण पथक अक्कलकोट जिल्हा सोलापूर,पंचायत समिती अक्कलकोट आरोग्य विभाग अक्कलकोट व जिल्हा प्रशासन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रॅली

अक्कलकोट /ज्ञानप्रवाह न्यूज, दि.25/04/2024- आज दि 25 एप्रिल 2024 रोजी जागतिक हिवताप दिनाच्या अनुषंगाने हत्तीरोग नियंत्रण पथक अक्कलकोट जिल्हा सोलापूर, पंचायत समिती,अक्कलकोट आरोग्य विभाग अक्कलकोट व जिल्हा प्रशासन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हिवताप व हत्तीरोग जनजागृती व मतदार जनजागृतीसाठी अक्कलकोट शहरातून पंचायत समिती,हनुर चौक,कारंजा चौक,फतेसिंग चौक,एवन चौक व विजय कामगार चौक येथून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

या रॅलीसाठी कल्याणशेट्टी शाळेतील 90 विद्यार्थी व खेडगी शाळेचे 140 विद्यार्थी व एनसीसी ग्रुप उपस्थित होते. या रॅलीसाठी गटविकास अधिकारी श्री कवितके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.करजखेडे, हत्तीरोग अधिकारी के.एस.मंजुळ , सहसंचालक आरोग्यसेवा(हि व ह) व जलजन्य आजार पुणे-6, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा पुणे हिवताप(हि)-6 , जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद, सोलापूर जिल्हा प्रशासन यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट शहरात पंचायत समिती येथून हिवताप जनजागृती व मतदार जनजागृती रॅली संपन्न झाली .

सदर रॅलीसाठी सौ.सुरेखा कल्याणशेट्टी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच श्री शिवशरण खेडगी प्रशाला अक्कलकोट मधील एनसीसी ग्रुप व शाळेतील एकूण 230 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

सदर रॅलीचे आयोजन हत्तीरोग कार्यालय, पंचायत समिती अक्कलकोट व जिल्हा प्रशासनाचे संयुक्त विद्यमाने करण्यात आले. या कामी हत्तीरोग कार्यालय व पंचायत समिती अक्कलकोट तसेच जिल्हा प्रशासन या कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी रॅली यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

यावेळी नागरिकांना आरोग्य शिक्षण व म्हणी/स्लोगन तसेच पोस्टर बॅनर याद्वारे आरोग्य शिक्षण व मतदार जनजागृती करण्यात आली.


Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading